आपल्या आयुष्यात अशी अनेक लोक असतात ज्यांच्यामुळे आपलं मोठं नुकसान किंवा मानसिक त्रास झालेला असतो. मात्र, यातील काही असे असतात ज्यांना आपण तोंडावर वाईट बोलू शकत नाही. पण अशा लोकांवरचा राग बाहेर काढायचा असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. हो कारण कॅनडामधील टोरंटो प्राणीसंग्रहालय वन्यजीव संरक्षण संस्थेने एक मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये तुम्ही तेथील झुरळांना तुमच्या नावडत्या बॉसचे किंवा जुन्या गर्लफ्रेंडचे नाव देऊ शकता.
रिपोर्टनुसार, या मोहिमेअंतर्गत तुम्ही जुनी गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, बॉस किंवा एखादा न आवडता मित्रांचे नाव झुरळांना देऊ शकता. या मोहिमेअंतर्गत लोक झुरळांना तुमच्या नावडत्या व्यक्तीचे नाव देण्यासाठी सुमारे २५ डॉलर म्हणजेच जवळपास १५०० द्यावे लागणार आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी टोरोंटो प्राणीसंग्रहालयाकडून एक ट्विट करण्यात आले आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, ‘लाल गुलाब, व्हायोलेट निळा, तुमच्या आयुष्यात कोणी आहे का जो तुम्हाला त्रास देणारा? या व्हॅलेंटाईन डेला त्याच्या सन्मानार्थ एका झुरळाला नाव द्या.’
हेही वाचा- प्रेयसीला ‘व्हॅलेन्टाइन डे’ची भेट देण्यासाठी महागडय़ा वाहनांची चोरी, आरोपीला अटक
शिवाय झुरळाचे नाव दिल्यानंतर तुम्हाला त्याबाबतचे डिजिटल प्रमाणपत्रही मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्ही ज्या झुरळाला दिलेले नाव लिहिलेलं असेल. यासोबतच धर्मादाय कराची पावती आणि डिजिटल फोटोही दिला जाईल, जो तुम्ही शेअर करू शकता. यासाठी तुम्हाला वेबसाइटवर ‘डोनेशन’ आणि ‘इन ऑनर ऑफ’ निवडावे लागेल. यानंतर तुम्ही एक नाव देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला ई-कार्ड पाठवण्याचा पर्यायही दिला आहे.
अपमानास्पद नावे देण्यास विरोध –
हेही वाचा- Viral Video: तरुणाला अतिघाई नडली, भर वर्गातच तरुणी भिडली, व्हॅलेंटाईन डे आधीच प्रपोज केला अन्…
या मोहिमेत, प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी लोकांना त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव झुरळांना देण्याची परवानगी दिली आहे. परंतु त्यासाठी कोणत्याही अपमानास्पद शब्दांचा वापर करण्याची परवानगी देलेली नाही.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
सोशल मीडियावर काही युजर्सनी या मोहिमेचे कौतुक केले तर काहींनी त्यावर टीकाही केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘ही मोहीम खरोखरच छान आहे. त्यात न पटणारे असे काही नाही. तर आणखी एका नेटकऱ्यांनी लिहिलं आहे की, ‘ही प्रक्रिया मजेदार वाटत असली तरी ती अयोग्य आहे.’