‘व्हॅलेंटाईन डे’ जवळ येतोय. रोझ डे, चाॅकलेट डे, वगैरे दिवसांमुळे आता माहौल तयार होतोय. प्रेमी-प्रेमिकांसाठी ‘झोपाळ्यावाचून झुलायचे’ हे दिवस आहेत. आधी व्यवस्थित प्लॅन करून बरोब्बर रंगाचा गुलाब निवडायचा. मग आपल्या मनातली हुरहूर काबूत आणत त्याला किंवा तिला तो गुलाब द्यायचा. व्हॅलेंटाईनच्या सीझनमध्ये गुलाब नाकारला जाण्याची शक्यता तशी कमी असली तरी गुलाब वगैरे देताना पोटात फुलपाखरं उडतातच.
मग येतात ते बाकीचे दिवस. चाॅकलेट डे झाला, प्रपोझ डे, किस डे वगैरेच्या दिवसांच्या विचारांनी मनात लड्डू फुटतात. मग जाम धैर्य करून ‘डेटवर येणार का?’ ची विचारणा होते. ‘ती’ त्या दिवशी येते. स्वप्नातल्याप्रमाणे सुंदर असणाऱ्या आणि याआधी कधीच बोलण्याचं धैर्य न झालेल्या आपल्या मैत्रिणीला चांगल्या प्रकारे ओळखण्याची संधी चालून येते. आणि त्या संभाषणात आपण रंगून जातो. एक्साईटमेंटमध्ये आपण बोलायला सुरूवात करतो.
“हाय” (कित्ती छान दिसतेय ना ती! आजची डेट यशस्वी करायचीच)
“हे, हाऊ आर यू?” तिचा सवाल
“फाईन, हाऊ आर यू?”
“आय अॅम डूईंग ग्रेट, आय मिस्ड यू सो मच” (याड लागलं भावा हे तिच्याकडून एेकल्यावर)
“मी टू” (लाजतोयस ते दाखवू नको तिला!)
“सो व्हाॅट्स न्यू इन लाईफ?”
“नथिंग. माॅर्निग माॅर्निंग वेंट टू काॅलेज. इव्हनिंग कमिंग हिअर” (काय बोललो आपण? तिच्या चेहऱ्यावरचे भाव जSरा बदललेत का?)
“ओके, सो टेल मी अबाऊट युअरसेल्फ” हसरा चेहरा ठेवत तिचा प्रश्न
आणि मग आपण गार.
हाय हॅलोपुढे इंग्लिश बोलताना गडबड होते? तरीही (फ्युचर) गर्लेफ्रेंडला इम्प्रेस करायचंय? आपल्यातले काही भिडू लोक या पुढच्या व्हिडिओमधला फंडा वापरतात. बघा जरा!
सौजन्य- फेसबुक
तर भिडू लोक….आपल्या भावांची मदत करा