Couple dance video: अनेक जण व्हॅलेंटाईन डेची वाट पाहत असतो आणि आज तो दिवस आहे. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमींसाठी त्यांचे प्रेम व्यक्त करण्याचा एक खास प्रसंग आहे. प्रेमाने भरलेला हा दिवस व्हॅलेंटाईन आठवड्याच्या शेवटी येतो. ७ फेब्रुवारीपासूनच व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. त्याची सुरुवात रोझ डे ने होते. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. प्रेमळ जोडपे देखील या दिवसाला खास बनवण्यासाठी अनेक तयारी करतात ज्याद्वारे ते त्यांचे प्रेम व्यक्त करू शकतात. दरम्यान व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी अशाच एका काका काकूंचा मराठमोळ्या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. तुम्ही काका-काकुंना देखील भन्नाट गाण्यांवर भन्नाट डान्स करताना पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काका-काकुंनी “अगं अगं पोरी फसलीस गं” गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे. यांसारखे अनेक काका-काकुंच्या डान्सचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण हा व्हिडिओ काही हटकाच आहे.  गाण्यांच्या बोलासोबत अगदी त्याला जुळतील अशा पद्धतीने डान्स स्टेप्स काका-काकू करत असतात. शेवट देखील भन्नाट आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, प्रेम हे वयाच्या प्रत्येक टप्प्यात तरुण असतं..खाद्या गोष्टीप्रती असणारी आवड किंवा मग त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन याच्या आड कधी वयाचा आकडा येता कामा नये, हा सिद्धांत अनेकजण पाळतात. अशाच सिद्धांताचं पालन करणारी एक जोडी, सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. व्हायरल होणाऱ्या सर्वच गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. ही जोडीसुद्धा अशाच एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या mansi.gawande.73 इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 

Story img Loader