Valentine’s Day Wishes for Friends and Family : १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे दरवर्षी प्रेमाचा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिवशी तरुण मंडळी आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर हा दिवस साजरा करतात. त्यांच्याविषयी असलेले प्रेम किंवा भावना व्यक्त करतात. त्यांना सरप्राइज, भेटवस्तू देतात. प्रेमावरील कविता, संदेश, गझल, गाणी, चारोळ्या एकमेकांना पाठवतात. आज आपण तुम्ही प्रिय व्यक्तींना पाठवू शकता असे काही काही हटके मेसेज जाणून घेणार आहोत. व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देताना तुम्ही वेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करू शकता. जाणून घेऊ या प्रेमावरील सुंदर संदेश…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेम म्हणजे तू आणि तू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

प्रेमाची जादूने तुझ्या हृदयाचा प्रत्येक कोपरा
फक्त आजच नाही तर दररोज भरू दे
आजन्म मला तुझे असेच प्रेम मिळू दे
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं खास नातं असतं
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर, हे न सांगताही जाण !!!
Happy Valentine’s Day

तुझ्याशी बोलताना काळ थांबावा,
क्षण हे सोनेरी हृदयात राहावा,
तुझ्या प्रेमात मी हरवून जातो,
साऱ्या जगाला विसरून जातो!
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

तुझ्यासह प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन आहे,
कारण प्रेम आणि तू दोन्ही माझे सर्वस्व आहे
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!

प्रत्येकाला मिळत नाही खरे प्रेम
डाव जरी चुकला तरी येथे होतो अनेकांचा गेम
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तू नक्कीच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे…….
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

जरा एकदा प्रेम करुन बघ
जरा एकदा मनाचं ऐकून बघ
जरा एकदा मोकळा श्वास घेऊन बघ
कधी स्वत:चा विचार न करता त्याग करुन बघ
जरा एकदा प्रेम करुन बघ
Be My Valentine….

मला तुझं हसणं हवं आहे,,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तू जवळ नसतानाही,
मला तुझं असणं हवं आहे…
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

तु माझ्याबरोबर असण्यापेक्षा तु सुखात असणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे…
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे

प्रेम म्हणजे मनाला देणारा गारवा
प्रेम म्हणजे फक्त मी आणि तू,
प्रेमाच्या दिवशी एकच गोष्ट सांगावीशी वाटते
ती म्हणजे I Love You!!!
हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे