अंकिता देशकर
Vande Bharat Express New Look Viral: वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यापासूनच या ट्रेनच्या लुकबाबत बरीच चर्चा आहे. अगदी बुलेट ट्रेनसारखा चेहरा मोहरा असणारी वंदे भारत एक्सप्रेस सद्य घडीला भारतातील सर्वात मॉडर्न लुकची ट्रेन आहे असं म्हणता येईल. याच वंदे भारत एक्सप्रेसचं नाव घेत एक नवा फोटो सध्या तुफान चर्चेत आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेल्या या फोटोतमध्येवंदे भारत एक्सप्रेसवर फुलांची रंगीत सुंदर नक्षी काढलेली दिसतेय. एवढाच नाही तर रेल्वे ट्रॅकवर सुद्धा फुलांची सजावट केलेली दिसतेय.
लाइटहाऊस जर्नालिज्मला व्हायरल होत असलेल्या फोटोसह एक कॅप्शन सुद्धा शेअर होत असल्याचे लक्षात आले. ओणम सणानिमित्त वंदे भारत ट्रेन सजवलेली असून ही ट्रेन कासरगोड ते त्रिवेंद्रम असा प्रवास करेल, असा दावाही केला जात आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर P. lakshminarayana ने व्हायरल दाव्यासह इमेज आपल्या प्रोफाइल वर शेअर केली.
इतर वापरकर्ते देखील त्याच दाव्यासह प्रतिमा शेअर करत आहेत.
तपास:
फोटो नीट पाहून आम्ही आमचा तपास सुरू केला. इमेजचे बॅकग्राउंड ब्लर होते आणि हे भारतातील स्टेशनसारखे दिसत नव्हते, अगदी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेली फुलेही खरी वाटत नव्हती. त्यानंतर आम्ही फोटोवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला.
२९ जुलै रोजी फेसबुकवर Aneesh Chakkottil या वापरकर्त्याने पोस्ट केलेला फोटो आम्हाला आढळला यातही पुन्हा तेच कॅप्शन होते.
या फोटोच्या एडिटिंगबाबत अनेकांनी कौतुक करत कमेंट केल्या होत्या. आम्हाला एक कमेंट देखील आढळली जिथे स्वतः युजरने आपण हा फोटो AI वापरून तयार केला असल्याचे म्हटले होते. त्यांच्या बायोद्वारे, आम्हाला कळले की अनीश चक्कोटील एक डिजिटल निर्माता आहे.
तपासात पुढे, आम्ही Hive Moderation, AI डिटेक्टरमध्ये इमेज अपलोड केली. वेबसाइटने सुद्धा हा फोटो ९९.८% एआय जनरेटेड असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा<< चिखलात आढळली महाकाय प्राण्याची नवी प्रजाती? डायनॉसोर, कासव, साळींदर सगळ्याचं मिश्रण, नीट बघा…
निष्कर्ष: ओणम सणासाठी सजवलेल्या वंदे भारत ट्रेनचा व्हायरल फोटो AI द्वारे निर्मित केलेला आहे. व्हायरल दावा खोटा आहे.