अंकिता देशकर
Vande Bharat Express Loco Pilot: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. या व्हिडिओ मध्ये दोन महिला दिसत असून त्यांच्या रुबाबदार लुकला पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये केलेल्या दाव्यानुसार या महिला वंदे भारत एक्सप्रेसच्या लोको पायलट आहेत. पूर्वी कोळश्यावर चालणाऱ्या रेल्वे होत्या, तिथपासून आपण प्रगती करून आता इतके पुढे आलो आहोत की एखाद्या एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आता रेल्वे कर्मचारी सुद्धा रुबाबदार दिसू लागले आहेत, असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. नेमकी या व्हिडिओची खरी बाजू काय व या महिला नेमक्या कोण आहेत हे पाहूया…
काय होत आहे व्हायरल?
आम्हाला हा व्हिडिओ ट्विटर यूजर Narayanan यांनी आपल्या प्रोफाइल वर शेअर केल्याचे दिसले.
इतर युजर्स देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडिओ डाउनलोड करून आणि InVid टूलमध्ये अपलोड करून आमचा तपास सुरू केला. यात आम्हाला काही कीफ्रेम्स मिळाल्या. मग आम्ही या कीफ्रेम्सवर गूगल लेन्सद्वारे गूगल रिव्हर्स इमेज सर्च केले. आम्हाला ही रील, ‘Indian Railways Ticketing’ या प्रोफाइल वर शेअर केल्याचे आढळून आले.
या रील वर पहिल्या कमेंट मध्ये आम्हाला या दोन्ही महिलांचे फोटो दिसले.
त्यांच्या आयडीच्या पट्ट्यावर, ‘Trivandrum Division’ असे लिहले होते.
आम्हाला हे फोटो आणि रील, ‘travelling_tte’ या इंस्टाग्राम प्रोफाइल वर सापडले.
हे Shijina Rajan (Chinnu) यांचे प्रोफाइल होते. त्या भारतीय रेल मध्ये TTE आहेत. आम्हाला ही रील त्यांच्या प्रोफाइल वर सापडली.
त्या नंतर आम्ही त्यांच्या स्टोरी हायलाईट तपासल्या, त्यावर अपलोड केलेल्या एका फोटोमध्ये आम्हाला रीलमधील दुसऱ्या महिलेचे प्रोफाइल सापडले, त्यांचे नाव होते डायना कॅलिंटन.
त्यांच्या प्रोफाइल वर देखील व्हायरल रील होती. आम्ही त्यांच्या नावावर गूगल सर्च केले आणि आम्हाला Kaumudi Online वर एक बातमी सापडली.
रिपोर्टमध्ये लिहिले होते कि, प्रसिद्ध खेळाडू पद्मिनी थॉमस या वंदे भारतच्या पहिल्या काही प्रवाशांपैकी एक होत्या. तिकीट तपासण्यासाठी आलेली टीटीई ही त्यांची मुलगी डायना जॉन सेल्वनच असल्याचे लक्षात येताच या मायलेकींनी एक गोड आनंदाचा क्षण शेअर केला.
हे ही वाचा<< १०,३९९ रुपयात खरेदी करा iPhone 13! Flipkart ‘बिग बिलियन डेज’ सेलच्या आधीच भन्नाट ऑफर, पाहा प्लॅन
निष्कर्ष: महिला लोको-पायलट असल्याचा दावा केलेला व्हायरल व्हिडिओ टीटीई शिजान राजन आणि डायना जॉन सेल्वन यांचा आहे. व्हायरल दावा खोटा आहे.