लहानपणापासून आपण वेगाने धावणाऱ्या रेल्वे पाहिल्या आहेत. भरधाव वेगाने धावणाऱ्या रेल्वेचं अनेकांना आकर्षण असतं. पण आपण कधी लोको पायलटच्या केबिनमधून रेल्वे कशी दिसते हे पाहिलं नाही. मात्र, सध्या दाड धुक्यातून भरधाव वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी हायस्पीड दर्जा स्वदेशी ट्रेन आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेस देशातील सहा मार्गांवर धावत आहे. तिचा वेग ताशी १५० किलोमीटरपेक्षा जास्त असतो. त्यामुळे ही ट्रेन हवेतच धावत असल्याचा अनुभव येत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी दिल्या आहेत. नुकताच वंदे भारत एक्सप्रेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दाट धुक्यातून ही रेल्वे धावताना दिसत आहे.

Many passenger trains canceled on East Coast Railway due to impact of cyclone Dana
‘दाना’ चक्रीवादळाचा रेल्वेला फटका; ऐन सणासुदीत प्रवासी गाड्या रद्द
26 October Daily Horoscope IN Marathi
Daily Horoscope, 26 October : आज मेष ते…
Jogeshwari railway station. Emergency drills Jogeshwari railway station,
मुंबई : दोन रेल्वेगाड्यांची टक्कर अन्…
Panvel to Nanded special trains on the occasion of Diwali 2024
दिवाळीनिमित्त पनवेल – नांदेड विशेष रेल्वेगाड्या
Mumbai Western Railway, new local train timetable
मुंबई : १५ डबा लोकलच्या २०९ फेऱ्या, पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात आजपासून बदल
Express train rams goods train near Chennai
तमिळनाडूमध्ये रेल्वेचा अपघात! म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसची मालगाडीला धडक; सुदैवाने जीवितहानी नाही
6556 special trains on the occasion of Diwali Chhath Puja Mumbai news
दिवाळी, छठ पूजेनिमित्त ६,५५६ विशेष रेल्वेगाड्या
Mumbai Local Train Update
Mumbai Local Train Update : दिवा-कोपरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांना मनस्ताप

हेही पाहा- Video: थंडीपासून बचाव करण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड, अंगावर इतके कपडे घातले की मोजणाराही थक्क झाला

उत्तर रेल्वेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रेल्वे ट्रॅकवर धुके दाटलेलं असताना वंदे भारत एक्सप्रेस त्या धुक्यातून रस्ता काढत धावताना दिसत आहे. धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी धुक्याची चादर छेदत वंदे भारत एक्सप्रेस आपल्या भरधाव वेगाने पुढे जात असल्याचं दृश्य आपणाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ म्हणजे खरचं एक अप्रतिम नजारा असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

हेही वाचा- “आम्हा दोघांमध्ये तेव्हा दुसरं कुणीच…,” रतन टाटा यांनी खास व्यक्तीसह शेअर केला फोटो

धुक्यातून धावणारी वंदे भारत एक्सप्रेस –

धुक्यातून भरधाव वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा व्हायरल होणारा व्हिडीओ उत्तर रेल्वेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. रेल्वेने शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांना आवडल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये ‘Speed ​​of New India’ असं लिहिलं आहे. व्हिडिओमध्ये, ट्रेन चालवतना लोको पायलट योग्य ती पूर्ण काळजी घेत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे.

व्हिडीओ पाहून नेटकरी झाले आश्चर्यतकित –

हेही पाहा- Video : उघडा होऊन विचित्र डान्स करणाऱ्याला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “आधी जेव नाहीतर…”

देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान सुरू झाली होती. त्यानंतर दिल्ली ते कटरा, मुंबई ते अहमदाबाद, नवी दिल्ली ते अंब अंदौरा आणि म्हैसूर ते चेन्नई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान या ट्रेनचा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. शिवाय या व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, ‘दाट धुक्यातून एवढ्या वेगाने धावणारी रेल्वे पाहून आश्चर्य वाटले, नवीन तंत्रज्ञानाला आमचा सलाम.’