वंदे भारत एक्सप्रेसने ट्रायल रनमध्ये नवा रेकॉर्ड बनवला आहे. ट्रायल रनमध्ये वंदे भारत एक्सप्रेस १८० किमी प्रतितास वेगाने धावली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘वंदे भारत-२ ची स्पीड ट्रायल कोटा नागदा सेक्शनमध्ये १२०/१३०/१५० आणि १८० किमी प्रतितास या वेगाने पार पडली. या ट्रायल रनचा व्हिडीओ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या आकर्षक लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिसर्च डिझाईन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन यांच्या देखरेखीमध्ये जबलपूर येथे वंदे भारत एक्सप्रेसचा ट्रायल रन पार पडला. ट्रेनच्या विविध टप्प्यांचे ट्रायल कोटा डिवीजनमध्ये करण्यात आले होते. यावेळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा ट्रायल रन वेगवेगळ्या वेगांमध्ये करण्यात आला.

आणखी वाचा – अबब! …अन् थेट १०० फूट खोल खड्डयात पडलं घर; सारं गाव बघायला गोळा झालं

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ

आणखी वाचा – कापलेल्या झाडाने उगवला सूड; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा भन्नाट व्हिडीओ पाहाच

रेल्वे मंत्र्यांनी ट्वीट केलेला हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रायल रनवेळी ट्रेनमध्ये भरलेला पाण्याचा ग्लास ठेवलेला दिसत आहे. १८० किमी प्रतितास हा वेग असताना देखील ग्लास स्थिर असलेला दिसत आहे. यावरून वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवास आरामदायी असणार आहे, हे चित्र स्पष्ट आहे. वंदे भारत एक्सप्रेस पूर्णतः भारतात बनवण्यात आली आहे. यातील खुर्च्या १८० डिग्री रोटेट करता येतील अशा आहेत. २०० किमी प्रतितास चालण्याची वंदे भारत एक्सप्रेसची क्षमता आहे. यामध्ये विशेष प्रकारचे ब्रेकिंग सिस्टम लावण्यात आले आहेत, ज्यामुळे विजेचा कमीत कमी वापर होईल. तसेच सर्व उपकरणे ट्रेनच्या खालच्या बाजूला लावण्यात आले आहेत, जेणेकरून केबिन मध्ये प्रवाशांना जास्त जागा मिळेल.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर याचा रिपोर्ट रेल्वे सेफ्टी कमिशनर यांना पाठवण्यात येईल. परवानगी मिळण्यानंतर यास नव्या मार्गिकेवर आणले जाईल. नव्या वंदे भारत एक्सप्रेसला अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान चालवले जाऊ शकते. पुढच्या वर्षी १५ ऑगस्ट पर्यंत ७५ वंदे भारत एक्सप्रेस बनवण्याची भारत रेल्वेची योजना आहे. यासाठी दर महिन्याला ६ ते ७ ट्रेन बनवण्याचे टार्गेट आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या देखरेखीमध्ये हा प्रकल्प सुरू आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande bharat express runs 180 kmph railway minister ashwini vaishnaw tweets video pns
Show comments