Vande Bharat Express Video From Loco Pilot Cabin: भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत X प्रोफाइलवर वंदे भारत एक्सप्रेसच्या लोको-पायलट केबिनमधील टाइम लॅप्स व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रेल्वेच्या ताफ्यातील सर्वात अत्याधुनिक अशी मानली जाणारी वंदे भारत एक्सस्प्रेस ही नेटकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय आहे. अनेकांना वंदे भारत एक्सस्प्रेसच्या सीटिंग पासून ते खाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीविषयी जाणून घ्यायचे असते. सोशल मीडियावर आतापर्यंत वंदे भारत मधून प्रवास केलेल्या अनेकांनी तपशीलवार व्हिडीओ शेअर केले आहेत ज्यांना नेटकऱ्यांनी खूप प्रेम दिले आहे. पण आज भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदाच कोणीही न पाहिलेले वंदे भारत एक्सस्प्रेसमधून दिसणारे दृश्य दाखवले आहे. या व्हिडीओने लोकांना हाय-स्पीड ट्रेनच्या प्रवासाचा एक अनोखा अनुभव दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

X वर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये लोको पायलट केबिनमधील कॅमेराने टिपलेले दृश्य दिसत आहे. नेमकं लोको पायलटच्या केबिनमधून दृश्य कसं दिसतं याविषयीच्या कुतूहलासाठी हा व्हिडीओ बेस्ट उत्तर ठरत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून रेल्वेने असा व्हिडीओ शेअर करत पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण दिले आहे. अशा नाविन्यपूर्ण व्हिडीओमुळे आम्हालाही न पाहिलेल्या अनुषंगाने प्रवास करता आला असेही काहींनी कमेंटमध्ये म्हटले आहे.

Video : वंदे भारत एक्सस्प्रेसच्या लोको पायलट केबिनमधून बघा प्रवास

हे ही वाचा<< मासेमाराने लांब जाळं टाकताना समुद्रात मारली उडी; भल्या मोठ्या लाटांमधील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल काटा

दरम्यान, भारतीय रेल्वेच्या या व्हिडिओसाठी कौतुक होत असले तरी काही दिवसांपासून वंदे भारत एक्सस्प्रेसमधील जेवणाचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओनुसार, प्रवाशांना जे जेवण दिले गेले होते ते खराब असल्याचे या व्हिडीओमधून सांगण्यात आले होते. आपल्याला आलेला अनुभव आकाश केशरी यांनी एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना भारतीय रेल्वे, वंदे भारत आणि भारतीय रेल्वे मंत्र्यांच्या अधिकृत अकाउंटला देखील टॅग केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande bharat express unseen video from loco pilot cabin how train runs superfast close look indian railway show exclusive clip svs