Vande Bharat Train Facilities: देशात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची संख्या सातत्याने वाढत आहे. यात २४ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी नऊ नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन भेट दिल्या आहेत. यामुळे देशातील अनेक राज्यांतील प्रवाशांना प्रवास जलद करण्यास मदत होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत रेल्वे प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने एक परिपत्रक जारी करत, पुढील सहा महिने वंदे भारत ट्रेनमध्ये पॅकेज फूड दिले जाणार नाही असे जाहीर केले आहे. आरोग्य स्वच्छता आणि ग्राहकांच्या प्रतिसादानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पण, प्रशासनाने अचानक वंदे भारत ट्रेनमधील पॅकेट फूड देणे का बंद केले जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ कारणासाठी पॅकेट फूडची सुविधा केली बंद

प्रवाशांच्या सूचना आणि तक्रारींच्या आधारे रेल्वे मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. रेल्वेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले की, बेकरी प्रोडक्ट्स, वेफर्स, मिठाई, कोल्ड्रिंक्स इत्यादी खाद्यपदार्थांच्या विक्रीबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ट्रेनच्या आत फेरीवाल्यांमुळे होणारी समस्या, द्रेनमधील खाद्यपदार्थांचा जास्त साठा आणि दरवाजे वारंवार उघडणे यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. या गोष्टी लक्षात घेऊन वंदे भारत ट्रेनमध्ये पॅकेट फूड वस्तूंच्या विक्रीला प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयआरसीटीसीला देण्यात आल्या ‘या’ सूचना

वृत्तानुसार, रेल्वे मंत्रालयाने IRCTC ला राउंड ट्रिपसाठी ‘रेल नीर’ बाटलीबंद पाण्याचा साठा न करण्याचेही निर्देश दिले आहेत. कारण या बाटल्या अधिक जागा घेतात. यामुळे आता एका ट्रीपपूर्ताच बाटल्यांचा साठा केला जाईल.

जेवणासाठी करावे लागेल प्री-बुकिंग

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, आता प्रवाशांना खानपान सेवांबाबत प्री-बुकिंग करावे लागणार आहे. वंदे भारत प्रवाशांना प्रवासापूर्वी २४ ते ४८ तास आधी पुन्‍हा एक एसएमएस पाठवेल. जे प्रीपेड जेवण निवडत नाहीत त्यांनी ट्रेनमध्ये ऑर्डर दिल्यास आणि जेवण उपलब्ध असल्यास ५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. या एसएमएसद्वारे प्रवाशांना जेवण आणि जेवणाचे प्रमाणदेखील कळेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande bharat packaged food railways stops packaged food in vande bharat trains for six months sjr