वंदे भारत ट्रेनचा प्रवासादरम्यान एका प्रवाशाला सांभरात किडे आढळून आल्याने त्याला त्रास झाला. तिरुनेलवेली ते चेन्नई या मार्गावर ही घटना घडली आणि दूषित जेवणाचे व्हिज्युअल सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

व्हिडिओमध्ये सांभारमध्ये काळे कीटक तरंगताना दिसले, ज्यामुळे अनेक वापरकर्ते प्रीमियम सेवेच्या अन्न गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत होते.

land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
Amrit Jyeshtha Nagarik yojna and Mahila Samman Yojana led to increased ST Pune Division Revenue
एसटी भरधाव ! महिला सन्मान याेजनेतून किती केली कमाई ?
Food stalls from IT Park to Mate Chowk have found new ways to avoid legal action
पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?
mmrda fined metro 9 contractor of rs 40 lakh after transit mixer operator die at metro site
मेट्रो ९ च्या कंत्राटदाराला ४० लाखाचा दंड; चालकाच्या मृत्यूनंतर एमएमआरडीएची कारवाई
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
15 crores governor post marathi news
१५ कोटी द्या, राज्यपाल करतो…तामिळनाडूतील एकाची कोट्यवधी रुपयांना फसवणूक

काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी व्हिडिओ शेअर केला आणि वंदे भारत गाड्यांवरील स्वच्छतेच्या मानकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले.

“प्रिय @AshwiniVaishnaw जी, तिरुनेलवेली-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये जिवंत कीटक आढळून आले आहेत, प्रवाशांनी स्वच्छता आणि IRCTC च्या जबाबदारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याचे निराकरण करण्यासाठी आणि प्रीमियम ट्रेन्सवर अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत?”

हेही वाचा –“माझा वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास नाही”; आठवड्यातील ७० तास काम करण्याच्या मतावर नारायण मूर्ती अजूनही ठाम

रेल्वेने केटररला ५०,००० रुपये दंड ठोठावला

याबाबत रेल्वेने निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की “तत्काळ तपास करण्यात आला.” दिंडीहुल स्थानकावरील आरोग्य निरीक्षकांनी अन्न पॅकेजची तपासणी केली.

त्यांच्या निष्कर्षानुसार हा कीटक सांभाराच्या आत न राहता ॲल्युमिनियमच्या डब्याच्या झाकणाला चिकटला होता.

त्यामुळे केटरिंग सर्व्हिस प्रोव्हायडरला रेल्वेने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

“दूषित होण्याचे कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले. या निष्काळजीपणासाठी वृंदावन फूड प्रोडक्ट्सच्या कंत्राटदाराकडून रु.५०,००० दंड आकारला जाईल आणि पुढील कारवाई सुरू आहे,” असे रेल्वेने सांगितले.

त्यात म्हटले आहे: “रेल्वे दूषित होण्याच्या स्त्रोताशी संबंधित सर्व शक्यता लक्षात घेऊन या घटनेचा तपशीलवार तपास करत आहे.”

हेही वाचा –लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video

येथे पोस्ट पहा:

उल्लेखनीय म्हणजे, वंदे भारत गाड्यांना अन्न सुरक्षेच्या समस्येचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्या एका प्रवाशाने त्याच्या जेवणात झुरळ सापडल्याची माहिती दिली.

सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा भाग असलेल्या वंदे भारत गाड्या त्यांच्या उच्च गती, सुधारित सुरक्षा मानके (enhanced safety standards ) आणि उत्कृष्ट सेवेसाठी ओळखल्या जातात.

Story img Loader