Viral Video : वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनविषयी तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ही ट्रेन देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन म्हणून ओळखली आहे. वंदे भारत ट्रेननंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळांवर धावणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वरून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनचा लूक दाखवण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला वंदे भारत स्लीपर ट्रेन आतून कशी दिसते आणि त्यात कोणत्या सुविधा आहेत. याविषयी सांगितले आहे. या स्लीपर ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. या ट्रेनची डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही या ट्रेनमधून एकदा तरी प्रवास करावासा वाटू शकतो. (Vande Bharat sleeper trains : will Nagpur to pune Vande Bharat sleeper trains start from 15 September)

हेही वाचा : Shocking Video: पोटासाठी राबणाऱ्या त्या माऊलीची चूक काय? रस्त्याच्या कडेला झाडू मारणाऱ्या महिलेला कारनं उडवलं

पाहा व्हायरल व्हिडीओ

nagpurkar_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वंदे भारत स्लीपर ट्रेन नागपुर ते पुणे १५ सप्टेंबर पासुन आपल्या सेवेत..” या अकाउंटवरून दावा केला आहे की ही ट्रेन नागपुर ते पुणे १५ सप्टेंबर पासुन सेवेत असणार आहे पण त्याविषयी अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : Shocking Video: पोटासाठी राबणाऱ्या त्या माऊलीची चूक काय? रस्त्याच्या कडेला झाडू मारणाऱ्या महिलेला कारनं उडवलं

हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलेय, “किती तिकिट आहे, फ्लाइटपेक्षा जास्त नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “हे खरं नाही. हा तीन महिन्याचा ट्रायल पिरेड आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे अजून पर्यंत निश्चित नाही. फक्त प्रस्ताव आहे.” काही युजर्सनी खोट्या बातम्या पसरवू नये, असा सल्ला दिला आहे.

ही ट्रेन येत्या तीन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. या ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असतील. त्यामध्ये थ्री टायर एसी, टू टायर एसी व फर्स्ट क्लास एसी असे तीन प्रकारचे डबे आहेत. सर्व डबे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन ताशी १६० किलोमीटर वेगाने धावेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande bharat sleeper trains nagpur to pune will start from 15 september video goes viral on social media watch viral video of vande bharat sleeper train ndj