Varanasi Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. यामधील सर्वात मोठी घडामोड घडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एक्झिट पोलच्या अगदी उलट खेळ रंगू लागला असून भाजपा २६ तर सपा ३२ जागांवर आघाडीवर आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ हजार ३०० मतांनी पिछाडीवर पडले आहेत. काँग्रेसचे अजय राज आघाडीवर आहेत. अजय राय यांना आतापर्यंत ११,४८० मते मिळाली आहेत. त्यामुळे भाजपला याठिकाणी सुरुवातीच्या कलानुसार धक्का बसला आहे. मात्र दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मीम्स तुफान व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून आणि लोकांची क्रिएटिव्हीटी पाहून तुम्हीही पोट धरु हसाल.
पाहा मीम्स
नरेंद्र मोदी पिछाडीवर गेल्यानंंतर एकापेक्षा एक असे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या मीम्समध्ये तुम्ही पाहू शकता, “सुरुवातीला क्लोज मार्जीन ठेवा कारण लोकांना जराही शंका नाही आली पाहिजे.” म्हणजेच ही तर मोदींची सुरुवातीची फक्त खेळी आहे असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
या मीम्समध्ये तर राहुल गांधी यांचा फोटो वापरुन मोदी पिछाडीवर असल्यामुळे राहुल गांधींना थोडा का होईना दिलासा मिळाला अशा पद्धतीचं मीम व्हायरल झालंय.
सध्याच्या मतमोजणीनुसार जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पिछाडीवर आहेत मात्र ते लवकरच आघाडीवर येतील अशा पद्धतीचं हेसुद्धा मीम व्हायरल होतंय.
हेही वाचा >> “आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो” सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना मीम्सच्या माध्यमातून निवडणूक आयोगानं सुनावलं
दरम्यान उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मोदी ६,३०० मतांनी पिछाडीवर होते. काँग्रेसचे अजय राय आघाडीवर आहेत. याचदरम्यान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत मोदींना डिवचलं आहे.
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जयराम रमेश यांनी ही पोस्ट टाकली. त्यांनी वाराणसी लोकसभा मतदासंघाबाबात फोटो टाकत काँग्रेस उमेदवार आणि मोदींना मिळालेल्या मतांचा फोटो टाकला. ‘हा तर फक्त ट्रेलर आहे’ अशी कॅप्शन लिहीत त्यांनी हे ट्विट केलं.