साड्यांच्या दुकांनात सूट जाहिर झाली अन् तिथे महिलामंडाळाने खरेदीसाठी गर्दी केली नाही तर नवलच म्हणावे लागेल. वाराणसीमधल्या महमूरगंज येथील साड्यांच्या दुकानात एवढी गर्दी झाली की या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी दुकानदाराला चक्क पोलिसांना बोलवावे लागले.
Viral : ‘या’ जांभळ्या पक्ष्याला फेसबुकवरून हटवा रे!
आपल्या दुकानातील जुन्या साड्यांच्या स्टॉक मार्गी लावण्यासाठी वाराणसीमधल्या महमूरगंज येथील दुकानदाराने घसघशीत सूट जाहिर केली होती. एक रुपयाला एक साडी अशी ऑफरच त्यांनी दिली होती. ही ऑफर ऐकून साडीच्या दुकानात महिलांची गर्दी जमली. या ऑफरला इतका प्रतिसाद मिळाला की कधी नव्हे ती या दुकानाच्या बाहेर महिलांची गर्दी पाहायला मिळाली. या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी दुकानदाराला चक्क पोलिसांना बोलवावे लागले. महिलांच्या गर्दीमुळे रस्त्यात ट्रॅफिक जाम झाले त्यामुळे नाईलाजाने या दुकानदाराला आपली ऑफर मागे घ्यावी लागली.
वाचा : दोन हजाराची साडी १६० रुपयांना
५०० रुपयांची खरेदी केली की मग १ रुपयांत साडी घेता येईल अशी अट या दुकानदाराची होती. नोटाबंदीनंतर कर्नाटकमधल्या बीदरमधील एका साडी विक्रेत्यानेही असाचा प्रकार केला होता. नोटाबंदीचा प्रचार करण्यासाठी त्याने चक्क १ रुपयात साडीची विक्री केली होती. सुष्टी दुष्टी साडीचे मालक चंद्रशेखर पसार्गे यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आपल्या दुकानातील सर्व साड्यांची विक्री १ रुपयाला केली होती.