Ghost Walking On Rooftops Viral Video : महादेवाची नगरी म्हणजे वाराणसीत लोकांना भुतं दिसत आहेत. भूत दिसल्याच्या दाव्यामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसीतील लोक घाबरले आहेत. परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी मुलांना घराबाहेर पडू देत नसल्याची परिस्थिती आहे. एवढंच नव्हे तर या भूताची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली असून हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. काय आहे या व्हिडीओंची वास्तविकता? वाराणसीमध्ये खरंच भुतासारखं कोण फिरतंय का? अशी अनेक प्रश्न हा व्हायरल व्हिडीओ पाहून पडतात. मग जाणून घ्या या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य…
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ वाराणसीच्या बडिगायबी भागातील व्हीडीए कॉलनीतला असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये एक सावली दिसत आहे, जी भूतासारखी दिसत आहे. एका पांढऱ्या कपड्यात ही सावली फिरताना दिसतेय. लोक ते भूत असल्याचा दावा करत आहेत. या व्हिडीओमुळे इथल्या लोकांमध्ये दहशतीचं पसरलंय. या व्हिडीओमध्ये हे भूत मध्यरात्री पार्क आणि टेरेसवर फिरताना दिसत आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडीओ चार दिवस जुना असून तो व्हायरल झाल्यापासून कॉलनीत खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशीला चारा दिल्यानंतर मुलगी म्हणाली, “नाच…!” तर पाहा पुढे काय घडलं?
कॉलनीत फिरणाऱ्या भुताच्या या व्हिडीओच्या तपासणीत एक नव्हे तर तीन भूतांचे व्हिडीओ समोर आले आहेत. सुरुवातीचा व्हिडीओ पाहून लोक नक्कीच घाबरले होते, पण जेव्हा इतर दोन व्हिडीओ आले तेव्हा सर्वांना समजू लागले की ही सावलीची आकृती भूत नसून कॉलनीतील लोकांना घाबरवण्यासाठी काही खोडकर व्यक्तींचा हात आहे. स्थानिक रहिवासी गणेश शर्मा सांगतात की, काही मुलांनी कॉलनीच्या सोशल मीडिया ग्रुपवर आधी हा व्हिडीओ बनवल्याची कबुली दिली, त्यानंतर बाहेरच्या लोकांना आरोपी करण्यात आले.
आणखी वाचा : Navratri 2022 : माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा गरबा डान्स; पाहा Viral Video
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : गाडी फुल स्पीडमध्ये असताना हरणाने इतक्या उंच उडी मारत रस्ता ओलांडला
शर्मा यांचे म्हणणे आहे की, हे सर्व लोकांना त्रास देण्यासाठी किंवा त्यांची चेष्टा करण्यासाठी करण्यात आले आहे. आता हे प्रकरण चिघळले आहे, स्थानिक लोक त्यावर कारवाई करण्याचे ठरवत आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लवकरच पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचेही स्थानिक लोक सांगत आहेत.