Viral News Today: एकीकडे वरुण धवनच्या भेडिया चित्रपटाची चर्चा असताना आता मध्य प्रदेशमधील एका १७ वर्षीय मुलाला खरोखरच असाच एक आजार झाल्याचे समजत आहे. मध्य प्रदेशमधील या मुलाच्या ‘वेअरवुल्फ सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराची दखल थेट लंडनच्या डेली मेलने सुद्धा घेतली आहे.नंदलेता गावातील १७ वर्षीय विद्यार्थ्याला ललित पाटीदारला वयाच्या सहाव्या वर्षी हायपरट्रिकोसिसचे निदान झाले होते. ही अत्यंत दुर्मिळ अवस्था मानली जाते, प्राप्त माहितीनुसार मध्ययुगीन काळापासून केवळ ५० जणांमध्ये हे सिंड्रोम आढळून आल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. ललितचे संपूर्ण शरीर केसांनी झाकलेले आहे. त्याचे वर्गमित्र त्याला माकड म्हणून चिडवतात. हीच मुलं ललित आपल्याला चावेल अशा भीतीने त्याच्यापासून लांब पळत असल्याचे स्वतः ललितने सांगितले आहे.
डेली मेलशी संवाद साधताना ललितने सांगितले की, मी अत्यंत साध्या घरातील मुलगा आहे, माझे बाबा शेतकरी असून मी सध्या १२ वीचे शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच माझ्या अंगावर भरपूर केस होते सुरुवातीला माझे मुंडण करण्यात आले होते. त्यांनतरही केस वाढत होतेच पण किमान ६ ते ७ वर्षाचा होईपर्यंत आई वडिलांना माझ्यात काही वेगळं जाणवलं नाही. मात्र त्यानंतर आमच्या हे लक्षात आले की माझ्या शरीरावर वाढणारे केस हे विचित्र वेगाने वाढत आहेत.
हे ही वाचा << विश्लेषण: वरुण धवनला झालेल्या ‘वेस्टिब्युलर हायपोफंक्शन’ आजाराचा सर्वाधिक धोका कुणाला? लक्षणे व उपचार जाणून घ्या
ललित पाटीदार व त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचा सल्ला घेताच मला हायपरट्रिकोसिस हा आजार असल्याचे समजले. मुळात हा आजार ललिताच्या कुटुंबातच काय तर मध्ययुगापासून अवघ्या ५० जणांमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे हा त्रास अनुवांशिक नाही हे स्पष्ट होते.
हे ही वाचा << Video: वाह्ह दादा वाह्ह! मगरीला धरायला टीशर्ट नेलं; मगरीनेही शांतपणे हात उचलला अन झटक्यात…
दरम्यान ललित म्हणतो की मला लहान मुलंघाबरतात , त्यांना मी प्राण्यांसारखा चावेन अशी भीती वाटते पण मला आता या सगळ्याची सवय झाली असून याचे काहीही वाईट वाटत नाही. जर मला त्रास होऊ लागला तर मी हे केस ट्रिम करतो पण हे केस आपल्या डोक्यावरील व शरीरावरील अन्य केसाप्रमाणेच पुन्हा वाढतात, यावर अद्याप तरी कोणताही ठोस उपाय नाही. ललित सांगतो की मी अन्य लोकांपेक्षा या एका गोष्टीमुळे वेगळा ठरलो आहे म्हणूनच मला त्याची लाज वाटत नाही उलट माझ्या या अनोख्या ओळखीचा अभिमान वाटतो .