Vasai Tungareshwa Viral video: पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात. या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात. काही पर्यटक तिकडे भलतंच साहस करतानाही दिसतात. पण, अशा साहसाने काही वेळा पर्यटकांच्या अगदी जीवावर बेतण्यासारखे प्रसंग घडतात. अशा घटना पाहता वारंवार सांगितलं जातं की, पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता, धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. अशाच प्रकारे काही पर्यटकांना वाहत्या पाण्यात उतरणे महागात पडले आहे. वसईतील तुगांरेश्वर येथे काही तरुण पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले, तर काही जण अडकून बसले होते. ही घटना २२ जुलै रोजी घडली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या रेस्क्यूचा थरार पाहून तुमचाही थरकाप उडेल

लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक दुर्घटना

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना (३० जून) घडली होती. ही घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. दरम्यान, अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यावेळी वसई येथील तुंगारेश्वर येथे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला अन् काही तरुण यामध्ये वाहून गेले. मुसळधार पावसामुळे वसईतील तुंगारेश्वर धबधबा ओसंडून वाहत आहे. पण, पावसामुळे होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तुंगारेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. तरीही पर्यटक धबधबा परिसरात गर्दी करत आहेत. यात हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. तरुणाई प्रशासनाचे आदेश झुगारून पिकनिकला जात आहे. पण, कधी कधी ही हौस महागात पडते आणि जीवावर बेतते. अशीच एक दुर्घटना वसईत उघडकीस आली आहे.

रेस्क्यूचा थरार

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाण्याच्या प्रचंड प्रवाहात एका दोरीला पकडून दोन तरुण पाण्यात अडकले आहेत. पाण्याच्या प्रवाहात ते कधीही वाहून जातील अशी परिस्थिती असताना यावेळी एक जण पाण्याच्या प्रवाहासोबत वरून येऊन वाहून गेल्याचं दिसत आहे. एक तरुण वाहून जाताच मागून आणखी एक तरुण वाहून जातो. यावेळी आजूबाजूचे पर्यटक या तरुणांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र पाण्याचा वेग हा वाढतच जात आहे.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C9ys3X3Noqh/?igsh=MXNiMHU0cmV5ZmJ3eQ==

हेही वाचा >> ‘अस्तित्वाच्या लढाईत संयम महत्वाचा’ माकडाने केला वाघाचा मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video

हा व्हिडीओ unexpolred_vasai नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचाही थरकाप उडाला आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “अशा ठिकाणी पावसाळ्यात जाऊच नये.” तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, बापरे या तरुणांचं पुढे काय झालं?