घर हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे काही हौशी लोक घराला आपआपल्या पद्धतीने छान सजवतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे. इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे. अन्यथा, चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात. घरात गरिबी आहे. घरात भांडणे, दुरावा निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते असे म्हटले जाते. वास्तूनुसार घरात एखादी वस्तू कोणत्या दिशेला ठेवली जाते त्याचा घरातील अनेक गोष्टींवर खूप प्रभाव पडतो. वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी एक विशिष्ट दिशा निश्चित केलेली आहे. वास्तूचे हे नियम पाळले नाहीत तर घरातील सदस्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

घरातील खिडकी सजवण्यासाठी अनेकजण निरनिराळ्या गोष्टी खिडकीवर ठेवतात. मात्र खिडकीवर काय गोष्टी ठेवू नये याविषयी तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

खिडकीवर चमकणाऱ्या काचेसारख्या प्रकाश परावर्तित वस्तू ठेवू नका. जसं की आरसा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने आसपासच्या कपड्यांसारख्या वस्तूंना आग लागू शकते.

  • काचेच्या वस्तू, फोटो फ्रेम यांसारख्या नाजूक वस्तू ठेवण्यासाठी ही जागा काही वेळा वाटू शकते, परंतु अशी चूक करू नका. कारण खिडकीतून येणारा वाऱ्याने लगेच ते पडून फूटू शकतात
  • खिडक्यांवर दुर्गंधीनाशक, ज्वलनशील स्प्रे कधीही लावू नका. कारण थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्यांचा स्फोट होऊ शकतो. स्फोट इतका जोरदार असू शकतो की खिडकीच्या काचा फुटल्या जाऊ शकतात.
  • खिडक्यांवर दुर्गंधीनाशक, ज्वलनशील स्प्रे कधीही लावू नका. कारण थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्यांचा स्फोट होऊ शकतो. स्फोट इतका जोरदार असू शकतो की खिडकीच्या काचा फुटल्या जाऊ शकतात.
  • खिडकीच्या फिटिंगचे नुकसान आणि घाण टाळण्यासाठी प्रथम मेणबत्त्या काढून टाका. कारण त्या सहज वितळतात आणि काढणे कठीण जाते. आपण खिडकीवर शॉवर जेल आणि इतर उत्पादने ठेवतो. पहिली गोष्ट म्हणजे पसारा होतो. दुसरी म्हणजे, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्या चांगल्या राहत नाही.

हेही वाचा – Smartphone cover: बॅक कव्हरमुळे हँग होतोय तुमचा मोबाईल, जाणून घ्या फोन गरम होण्यामागचं कारण

घराच्या खिडकीवर वाढदिवसाचे कार्ड, फुलदाणी, बाटली अशा वस्तू ठेवू नका. याच्या मदतीने तुम्ही खिडकी व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाही.

Story img Loader