Vat Purnima 2023 Messages Quotes Wishes in Marathi: देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या तिथीवर वटपौर्णिमा साजरी केली जाते. उत्तरेकडील राज्यांमध्ये ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला तर मध्य भारतात ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये या वर्षी वट पौर्णिमा ही ३ जूनला साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सकाळी ११ वाजता सुरू होणार तर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे. हल्ली कोणताही सण असो शुभेच्छा देताना WhatsApp Status, इंस्टाग्राम स्टोरीज, फेसबुक पोस्ट हे महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच वटपौर्णिमेच्या शुभेच्छा अगदी मराठमोळ्या ढंगात देण्यासाठी मराठी शुभेच्छा मेसेज, Wishes, HD Images, आम्ही आजच शेअर करत आहोत. तुमच्या मैत्रिणींसह ही मराठी ग्रीटिंग्ज व शुभेच्छापत्र फ्रीमध्ये डाउनलोड करून शेअर करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वटपौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा

एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

दोन क्षणाचे असते भांडण
सात जन्माचे असते बंधन
कितीही आले जरी संकट
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

विचार आधुनिक आपले जरी,
श्रद्धा देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे
करूया वटपौर्णिमा साजरी

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

सर्व मैत्रिणींना वटसावित्रीच्या अर्थात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचे वटपौर्णिमा स्पेशल लुक लोकसत्ताच्या पेजवर पाहण्यासाठी आम्हाला फेसबुक व इंस्टाग्रामवर टॅग करायला विसरू नका!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vat purnima 2023 marathi wishes messages quotes hd greetings to share on whatsapp status instagram facebook free download svs