Vat Purnima Ukhane In Marathi 2024 : पतीच्या दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी विवाहित महिला दरवर्षी वटपौर्णिमेचा सण साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करीत वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा २१ जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने विवाहित स्त्रिया सौभाग्यलंकार परिधान करून सुंदर सजतात, वडाची पूजा करून एकमेकांना कुंकू लावून वाण देतात. यावेळी एकमेकांना उखाणा घेण्यास सांगितले जाते. विशेषत: नववधूंना वटपौर्णिमेच्या दिवशी उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो. त्याचनिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी काही हटके आणि नवे उखाणे घेऊन आलो आहोत.

वटपौर्णिमा स्पेशल उखाणे (Vat Purnima 2024 Special Ukhane Marathi)

१) वटपौर्णिमा आहे, सुहासिनींसाठी खास सण,
…..रावांनी जिंकले, पहिल्या भेटीतच माझे मन.

२) पतीच्या दीर्घायुष्यासाठी, निष्ठेचे बंधन,
…..रावांचे नाव घेऊन, करते सर्वांना वंदन.

३) आयुष्यात सुख-दुःखे दोन्ही असावे,
…..रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

४) वडाची पूजा करून, गुंडाळते सफेद धागा,
…..रावांच्या जीवनात सदैव असू दे केवळ माझ्यासाठीच जागा

६) श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग,
…..राव नेहमीच राहू देत माझ्या संग

हेही वाचा – वटपौर्णिमेच्या वाणात ‘ही’ पाच फळंच का ठेवली जातात? काय आहे महत्व? घ्या जाणून

७) वटवृक्षाच्या छायेत वनदेवी घेते विसावा,
…..रावांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा

८) सावित्रीने केली सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड,
…..रावांची होती मला कॉलेजपासून आवड.

९) नवा छंद, नवा ध्यास, शोधी नवे आकाश,
…..रावांसोबत लग्न होताच पडला माझ्या आयुष्यात प्रकाश.

१०) वटपौर्णिमा म्ह्णून आज, बाजारातून आणले फणसाचे गरे, 
….. रावांचे नाव घेते, अशेच सुखी राहुद्यात सारे.

११) खुळं काळीज हे माझं, तुला दिलं मी आंदण,
…..रावांच्या संसारात सुखाने नांदन.

हेही वाचा – Vat Purnima 2024 : यंदा वटपौर्णिमेला वडाची पूजा करण्याचा मुहूर्त कोणता? जाणून घ्या पूजेची शुभ वेळ आणि महत्त्व

१२) देव बनवतो साताजन्माची गाठ,
….. रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला मारते फेरे सात

१३) जीवनाला सुगंध असावा चंदनाचा,
…..चे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा

१४) भरजरी साडीला जरीचा खण,
…..रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण

१५) गुरूंनी दिले ज्ञान, आई-वडिलांनी दिले संस्कार, वटपौर्णिमेच्या दिवशी देते वचन
…..रावांसोबत करेन संसाराची नौका पार

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vat purnima 2024 vatpurnima special ukhane list in marathi vat savitri 2024 sjr