रोजच्या जेवणासाठी कष्ट करणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे, कारण रोजच्या जेवणातील शाकाहारी थाळी आता महागली आहे. “जानेवारीमध्ये घरगुती शाकाहारी थाळीच्या किंमतीत वार्षिक आधारावर ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर मांसाहारी थाळीच्या किंमतीत १३ टक्क्यांनी घट झाली आहे, असे बुधवारी एका अहवालात म्हटले आहे. पण मासांहारी थाळीच्या किंमतीत घट झाल्याने त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिसिल मार्केट इंटेलिजेंस अँड ॲनालिटिक्स (MI&A) संशोधन ‘राइस रोटी रेट’ च्या अंदाजानुसार, “डाळ, तांदूळ, कांदा आणि टोमॅटो यांसारख्या घटकांच्या किंमती वाढल्यामुळे जानेवारीमध्ये घरगुती भाजी असलेली थाळी महाग झाली आहे, तर पोल्ट्रीचे दर घसरल्याने मांसाहारी थाळीच्या किंमती कमी झाल्या आहेत.

कांदा आणि टोमॅटोची वाढली किंमत

वर्षानुवर्षे कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीत अनुक्रमे ३५ टक्के आणि २० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शाकाहारी थाळीची किंमत वाढली आहे, असे अहवालात म्हटले आहे. तसेच भात ( शाकाहारी थाळीच्या किंमतीच्या १२ टक्के) आणि डाळींच्या (९ टक्के) किंमतीही अनुक्रमे १४ टक्के आणि २१ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

या अहवालात असेही म्हटले आहे की,”दरम्यान, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत, उच्च उत्पादनामुळे मांसाहारी थाळीच्या किंमतीत घट झाली परिणामी जानेवारीमध्ये ब्रॉयलरच्या किंमतीत २६ टक्क्यांनी घट झाली आहे. अनुक्रमे, शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किंमतीत अनुक्रमे ६ टक्के आणि ८ टक्क्यांनी घट झाली.

ब्रॉयलरच्या किंमतीत घट झाल्याचा परिणाम

कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीत अनुक्रमे २६ टक्के आणि १६ टक्क्यांनी महिना-दर-महिना घट झाल्यामुळे, निर्यातीवरील अंकुश आणि उत्तरेकडील आणि पूर्वेकडील राज्यांमधून ताज्या टोमॅटोची आवक यामुळे कांद्याचा देशांतर्गत पुरवठा वाढल्याने खर्चात सुलभता आली असे अहवालात म्हटले आहे.

यासह, ब्रॉयलरच्या किंमतीत महिन्या-दर-महिन्यात ८-१० टक्क्यांनी घट झाल्याने मांसाहारी थाळीच्या किंमतीत मोठी घट झाली आहे, जी किंमतीच्या ५० टक्के आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veg thali cost increases in jan non veg thali rates fall snk
Show comments