Vegetable Seller Video : तुमच्यापैकी अनेक जण स्टेशनजवळील भाजी मार्केटमधील विक्रेत्यांकडून भाज्या, फळं खरेदी करतात. पण, अशा विक्रेत्यांकडून भाज्या खरेदी करताना थोडी सावधगिरी बाळगा. विशेषत: फळं आणि भाज्यांचे वजन करताना नेहमी सतर्क राहिले पाहिजे. कारण विक्रेते कधी कशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करतील सांगता येत नाही. सोशल मीडियावर ग्राहकांच्या फसवणुकीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात विक्रेता जे काही करतो ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. अनेकांनी विक्रेत्याकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे म्हटले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत असल्याचे दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती त्याच्याकडे टोमॅटो विकत घेण्यासाठी येतो आणि तो स्वत: टोमॅटो निवडतो आणि ते वजन करण्यासाठी विक्रेत्याकडे देतो. यावेळी ग्राहकाचे लक्ष नसताना विक्रेता त्याने आधीच वजन करून ठेवलेल्या टोमॅटोची पिशवी ग्राहकाला देतो, जे ग्राहकाच्याही लक्षात येत नाही. ग्राहकाचे लक्ष नसताना तो अतिशय चलाखीने टोमॅटोच्या पिशव्यांची अदलाबदली करतो आणि ग्राहकाला आधीच करून ठेवलेली पिशवी देतो.

video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
How to prevent oil splashing when frying Chillies
मिरची तळताना तेल अंगावर उडते? हुशार सुनबाईंनी शोधला भन्नाट जुगाड, Viral Video पाहून बघाच
nikki tamboli and samir choughule
Video: निक्की तांबोळी आणि समीर चौघुले यांनी सांगितली चमचमीत बटाटावड्याची रेसिपी; पाहा व्हिडीओ
How To Make Roti Quickly Desi Jugaad Video Viral on social media
आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
Pune farmer desi jugaad video farmer jugaad to protect field from bird watch video
VIDEO: पुणेरी शेतकऱ्यानं पक्ष्यांनी ज्वारी खाऊ नये म्हणून केला भन्नाट जुगाड; एक रुपयाही खर्च न करता पिकांचं कायमचं संरक्षण
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
content creator Kadi Tucker fell in love with Vada Pav The recipe was explained in Marathi netizens praised her viral video
परदेशी तरुणी पडली वडापावच्या प्रेमात! मराठीत सांगितली रेसिपी, Viral Video पाहून नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक

विक्रेत्याने चलाखीने केली ग्राहकाची फसवणूक

विक्रेत्याने एकतर ते टोमॅटो खराब असतील म्हणून ते ग्राहकाला दिले असतील किंवा टोमॅटोच्या वजनात छेडछाड केली असेल, असा अंदाज बांधला जात आहे. पण, अनेक भाजी विक्रेते अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक करतात, त्यामुळे रस्त्यांवर भाजी विकत घेताना काळजी घ्या.

Read More News On Trending- मामीचा जडला भाचीवर जीव! तीन वर्षांच्या अफेअरनंतर पळून जाऊन केले लग्न अन्…; वाचा अजब प्रेमकहाणी

“गरीबांबरोबर असा वागशील तर तू कधीच श्रीमंत होऊ शकत नाही” युजर्सच्या कमेंट्स

हा व्हिडीओ @jamre08 या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, गरीब गरिबांना लुटत आहेत. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, भावा, गरीबांबरोबर असा वागशील तर तू कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. तिसऱ्या युजरने लिहिले की, याच गोष्टीमुळे तो आयुष्यभर भाजी विकतोय.

Story img Loader