Viral video: भाऊ जरा चांगली आणि ताजी भाजी द्या…भाजी विकत घेताना हे वाक्य नेहमीच आपल्या तोंडी असतं. भाजी विकत घ्यायची म्हटली तर आपण ती भाजी ताजी आहे की नाही याची सारखी विचारणा विक्रेत्याला करत असतो. कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. पण तुम्ही विकत घेतलेली भाजी ही गटाराच्या पाण्यात धुतलेली आहे असं कळलं तर नक्कीच मोठा धक्का बसेल. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत भाजी विक्रेत्या महिला चक्क गटाराच्या वाहत्या पाण्यात भाजी बडवून स्वच्छ करत विकत असल्याचा संतापजनक प्रकार दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या पावसाच्या सरी सगळीकडे बरसत आहे. यामुळे विविध प्रकारचे आजार डोके सुद्धा वर काढत आहे. अशातच भाजी विक्रेत्याकडून नालीत भाजी धुवून विक्री करणे हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखं प्रकार आहे. या प्रकारामुळे गंभीर आजार देखील पसरले जाऊ शकतात.अशा भाजी विक्रेत्यावर कारवाईची मागणी नागरीक करत आहेत.गटाराच्या वाहत्या पाण्यात भाजी धुत असताना यावेळी काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि मोबाइलमध्ये कैद केला. या घटनेमुळे आपण घेणारा भाजीपाला किती स्वच्छ आणि ताजा आहे हा प्रश्न सतावणारा आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वरुन धो धो पाऊस कोसळत आहे. यावेळी रस्त्याच्या कडेला काही महिला भाज्या विकताना दिसत आहे. मुसळधार पाऊस पडत असतानाही अनेकजण भाजी विकत आहे. अशातच एक महिला व्हिडिओत दिसत आहे. जी रस्त्यावरुन वाहणाऱ्या गाटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुताना दिसून येत आहे. हे पाणी फारच खराब आहे. ते गटाराजवळ असल्यामुळे त्या पाण्यात किती विषाणू असू शकतात याचा आपण अंदाजा देखील लावू शकणार आहे. त्याची अशीच भाजी कोणी विकत घेतली तर त्यामुळे लोक आजारी पडू शकतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: झेरॉक्सच्या दुकानाबाहेर मालकानं लावली अशी पाटी की होऊ लागली गर्दी; मार्केटींगची हटके आयडिया पाहून पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर हा फोटो the_burgman_diaries नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “यांच्यावर लगेच कारवाई करा” तर आणखी एकानं “आता खायचं तरी काय, जगायचं की नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable vendor caught washing vegetables in dirty water on street shocking video goes viral on social media srk