Viral Video : सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे काही व्हिडीओ असतात, जे पाहून खूप आश्चर्य वाटते. तर काही व्हिडीओ फार मनोरंजक, भन्नाट असतात, जे पाहून हसू आवरणं कठीण जाते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात बाजारपेठेत एक विक्रेता अशा काही भन्नाट पद्धतीने भाजी विकतोय की, त्याचे बोलणे ऐकून तुम्हीही हसून हसून लोटपोट व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.

तुम्ही कधी भाजी मंडईत कधी गेलात, तर तिथे पाहिले असेल की, विक्रेते ग्राहकांना बोलावण्यासाठी अनोख्या स्टाईलने ओरडत असतात. काही विक्रेते तर अगदी तालासुरात ओरडत असतात, जे ऐकूनच अनेकांचे लक्ष त्या विक्रेत्याच्या स्टॉलकडे जाते. अशा प्रकारे अनेक भाजी विक्रेते त्यांच्या अनेक स्टाईलमुळे सोशल मीडियावर व्हायरलदेखील झालेत. त्यात आता हा एक भाजीविक्रेता त्याच्या मेथीच्या जुड्या विकण्याच्या भन्नाट स्टाईलमुळे चर्चेत आला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका भाजी मंडईत विक्रेत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. प्रत्येक विक्रेता आपापल्या स्टॉलवर भाज्या विकण्यासाठी बसलाय. याच विक्रेत्यांमध्ये एक विक्रेता एकदम हटके स्टाईलमध्ये मेथीच्या जुड्या विकतोय. “मेथीच्या पेंढ्या १५ ला दोन”, “मेथीच्या पेंढ्या १५ ला दोन”, असे अगदी तालासुरात म्हणत तो ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतोय. तो “मेथीच्या पेंढ्या १५ ला दोन”, हे वाक्य तो वेगवेगळ्या प्रकारे म्हणतोय, जे ऐकताना खूपच हसायला येतेय. तुम्ही “सांसो की माला पर’ ही कव्वाली ऐकली असेल, तर अगदी त्याचीच चाल विक्रेत्याने आपल्या या वाक्याला दिली आहे. तो हातवारे करीत जणू काही गाणेच म्हणतोय अशा प्रकारे तो “मेथीच्या पेंढ्या १५ ला दोन”, असे म्हणतोय. त्यामुळे त्याच्याकडे मेथी खरेदी करण्यास येणारे ग्राहकही हसताना दिसतायत. त्याची भाजी विकण्याची ही स्टाईल आता अनेकांना फार आवडली आहे.

भाजी विक्रेत्याची भाजी विकण्याची हटके स्टाईल ( Viral Video )

भाजी मंडईतील हा मजेशीर व्हिडीओ @rahul_benkar_ नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलाय. त्यावर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटले की, अरे, पेंढ्या नाही जुड्या म्हणतात रे, दुसऱ्याने लिहिले की, याला म्हणतात ओरिजिनल शेतकरी बास. पटलं वाघा…