Giant Python Viral Video : साप समोर दिसला की भल्या भल्यांच्या अंगावर काट उभा राहतो. अशातच विषारी साप असेल, तर अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सापांच्या दुनियेत जाणं म्हणजे लाखमोलाचा जीव मृत्यूच्या दारात घेऊन जाण्यासारखंच असतं. पण जेव्हा साप मानवी वस्तीत येतात तेव्हाही अनेकांचा थरकाप उडल्याशिवाय राहत नाही. कारण सापासारखा सरपटणारा प्राणी प्राणघातक असल्याने तो जिथे दिसेल, त्या ठिकाणी अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. अमेरिकेतील फ्लोरिडाच्या हायवेवरही एका विशाल अजगराने वाहनांचा ताफा अडवला. अजगर इतका मोठा होता की, त्याला पाहून वाहनचालकांचा थरकाप उडाला. महाकाय अजगराने हायवेवर धावणाऱ्या वाहनांची गती काही सेकंदातच कमी केली. हे थरारक दृष्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. १५ फुटांहून अधिक लांब असलेला हा अजगर येथील राष्ट्रीय उद्यानातून थेट हायवेवर आल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या वाहनांचा वेग काही सेकंदातच मंदावला, अजगराने केलं असं काही…
फ्लोरिडाच्या राष्ट्रीय उद्यानातून निघालेला अजगर थेट हायवेवर आल्यानंतर वाहनचालकांना अचानक गाड्या थांबवाव्या लागल्या. अजगराचा दराराच असा आहे की, समोर असलेला माणूस थेट त्याच्याजवळ जात नाही. अजगर सापासमोर भल्या भल्यांचा भीतीने थरकाप उडतो. या अजगरासमोरही वाहनचालकांनी नम्रतेची भूमिका घेऊन त्याला जंगलात जाण्यासाठी वाट करून दिली. एरव्ही भरधाव वेगानं धावणारी वाहनं थेट सापांच्या अंगावरून जातात आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो. पण अजगराची दहशतच अशी आहे की, तो दिसल्यावर त्याला सन्मानाने सोडावं लागतं. कारण अजगराच्या विळख्यात अनेकांचा श्वास गुदमरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या अजगराचा थरारक व्हिडीओ किम क्लार्क नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
इथे पाह व्हिडीओ
जंगलातील दुनियेत कधी कुणाची शिकार होईल, हे सांगता येणार नाही. सोशल मीडियावर नेहमीच रानावनात भटकणाऱ्या प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल झालेले दिसतात. एखादा प्राणी दुसऱ्यांची शिकार करतो, तर कधी दुसऱ्या प्राण्यांच्या हल्ल्यात स्वत:च शिकार होतो. अनेकदा वन्यप्राणी जंगलात भटकताना दिसतात. तसंच सरपटणारे सापही त्यांची शिकार शोधायला जंगल सफारी करताना दिसतात. एका जगंलात अशाच प्रकारचा विशाल अजगर जमिन खोदताना आढळला होता. बुलडोझर जमिनीचं खोदकाम करत असताना २० फुटांचा भलामोठ्या अजगराने विळखा घालून समोर दिसल्याचं एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत समोर आलं होतं. हा थरारक व्हिडीओ wild_animal_pix नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला होता. जंगलात २० फूट लांबीचा आणि जवळपास १०० किलो वजनाचा हा अजगर स्थानिक लोकांना दिसला होता. त्यानंतर बुलडोझरच्या साहय्याने या अजगराला जमिनीतून बाहेर काढण्यात आले.
इथे पाहा व्हिडीओ