Velomobile Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यांना पाहून लाखो नेटकरी थक्क होतात. नुकताच बंगळुरुच्या रस्त्यावरील एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बंगळुरुच्या हायवेवर एक आगळीवेगळी गाडी फिरताना दिसत आहे. या कारला पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला असून इंटरनेटवर या कारचं नाव शोधण्यात सर्व जण व्यस्त झाले आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ बंगळुरुचा असून येथील रस्त्यावर ही भन्नाट कार फिरताना दिसली आहे.
व्हायरल व्हिडीओत असलेली कार डॉल्फीन माशाच्या आकारासारखीच दिसते आहे. कार खदेरी करण्याची आवड असणाऱ्या लोकांना या कारला पाहून धक्काच बसला आहे. कारण एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी ही कार रस्त्यावर धावताना क्वचितच कुणी पाहिली असेल. आश्चर्यकारक बाब म्हणजे या कारमध्ये एकच व्यक्ती दिसत आहे. तो त्याच्या पायांच्या मदतीने ही कार चालवताना दिसत आहे.
ही भन्नाट कार सपाट रस्त्यावर ३० ते ५० किमी प्रतितास वेगाने धावते आणि….
तीन चाकांची ही भन्नाट कार रस्त्यावर फिरत असताना कॅमेरात कैद झाली आहे. या कारला पाहून लोक चक्रावून गेली आहेत. खरंतर हा एक वेलोमोबाईल आहे. याला तीन चाकांची सायकल कार बनवली आहे. अशा कार खासकरून युरोपीय देशात पाहायला मिळतात. वाहनचालक खाली वाकून या कारला चालवत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या कारला चारही बाजूंनी एक कवर लावण्यात आलं आहे. ज्यामुळे वाहनचालकाला प्रत्येक ऋतुमध्ये संरक्षण मिळण्यासा मदत होईल. सपाट रस्त्यावर ही कार ३० ते ५० किमी प्रतितास वेगाने धावते.
इथे पाहा व्हिडीओ
या जबरदस्त कारचा व्हिडीओ @RevanthD18 नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. कारचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं की, ही सायकल फनीश नागराजाची आहे आणि ही कार सर्वप्रथम २०१९ मध्ये पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस इव्हेंटमध्ये दिसली होती. या निळ्या आणि सफेद रंगाच्या कारची निर्मिती रोमानियाई कंपनी वेलोमोबाईल वर्ल्डने केली आहे. या वेलोमोबाईल सायकल कारच्या बेस वेरिएंटची किंमत भारतात जवळपास १४ रुपये असल्याचं बोललं जात आहे. तर बंगळुरुत दिसलेल्या या कारच्या मॉडेलची किंमत १८ लाख रुपये असल्याचं समजते.