Viral Video: सोशल मीडिया रिल्सचा खजिना झाला आहे. जगभरातील लोक रिल्सद्वारे त्यांच्या कलेचं सादरीकरण करत असतात. यातील बरेच जण त्यांचे पाककृतीचे कौशल्य जगासमोर घेऊन येतात ; जे पाहून अक्षरशः तोंडाला पाणी सुटते तर काही जण पाककृती बनवण्याच्या विचित्र पद्धती जगासमोर घेऊन येत असतात ; जे पाहून अंगावर शहारे येतात. डॉली चहा विक्रेता, दिल्लीची वडापाव गर्ल नंतर आता बांगलादेशातील एक विक्रेता तुफान व्हायरल होत आहे. ही व्यक्ती अनोख्या पद्धतीने ‘झाल मुरी’ बनवताना दिसते आहे.
सुरवातीला जाणून घेऊ झाल मुरी म्हणजे काय? तर झाल मुरी भारतातील बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या स्ट्रीट फूडपैकी एक आहे. आता व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये केशरी टी-शर्ट आणि निळी पँट घातलेली एक व्यक्ती, डोळ्यांवर काळ्या रंगाचा सनग्लासेस लावून, कानात इअरफोन घालून उभी आहे. तसेच ही अनोख्या पद्धतीने झाल मुरी तयार करत असल्याचे दिसत आहे. झाल मुरी हा कुरमुरे, चिरलेला कांदा, काकडी, मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर, लोणचं, मोहरीचे तेल, उकडलेले बटाटे, शेंगदाणे, चना चुर, भुजिया, खोबर आदी पदार्थांनी मिळून बनवला जातो. पण, मग तुम्ही विचाराल हा व्हिडीओ का व्हायरल होत आहे. तर यासाठी तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ बघा.
हेही वाचा…मैदानात रंगला खेळ! श्वानाने दिली तीन तरुणांना टक्कर ; VIDEO तून पाहा व्हॉलीबॉलचा ‘हा’ अनोखा सामना
व्हिडीओ नक्की बघा…
विक्रेत्याचा पदार्थ बनविण्याचा स्वच्छ आणि नीटनेटकेपणा पाहून ग्राहकवर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत असतो. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, झाल मुरी बनवण्यासाठीचा व्यक्तीचा स्टॉल नीटनेटका नाही आहे. तसेच ही व्यक्ती स्टीलचे भांड किंवा बाउल न वापरता एशियन पेंट्सच्या प्लास्टिकच्या बादलीत हा पदार्थ बनविते आहे. तसेच कोणतेही हात मोजे न घालता हाताने हे मिश्रण एकजीव करताना दिसत आहे ; ज्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत आणि हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @original_food01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संताप तर काही जण मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘भाऊ नवीन व्हायरस तयार करत आहे’. तर दुसऱ्याने कमेंट केली आहे की, ‘बनवणाऱ्याला हे कृत्य घृणास्पद नाही वाटत आहे का ?’ ; आदी अनेक कमेंट नेटकरी करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत.