Unauthorized Water Bottles Selling in Train : भारतीय रेल्वे सोशल मीडियावर नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी रेल्वेमध्ये कोणी स्टंटबाजी करत, कोणी डान्स करते, कधी कोणाचा अपघात होतो तर कधी रेल्वे मधील अस्वच्छ किंवा असुविधा दर्शवणारे व्हिडिओ समोर येतात. सध्या अशाच एका व्हिडिओ चर्चा होत आहे. गोरखपूर-लोकमान्य तिळक सुपरफास्ट एक्सप्रेस (२०१०४) मध्ये विक्रेत्यांना अनधिकृत पाण्याच्या बाटल्या विकताना दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फुटेजमुळे संताप व्यक्त होत आहे, भारतीय रेल्वेमधील “भ्रष्टाचार” असल्याचा आरोप करत युजर्सनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली आहे.

एक्सवर एका पत्रकाराने शेअर केलेल्या या तारीख नसलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये एसी कंपार्टमध्ये अधिकृत बाटल्या उपलब्ध असूनही एका प्रवाशाला ट्रेनमध्ये अनधिकृत पाण्याच्या बाटल्या विकल्याबद्दल विक्रेत्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रवासी विक्रेत्यांना शाळा घेत आहेत आणि एसी डब्यात प्रवेश करणाऱ्या पान मसाला विक्रेत्याला देखील प्रश्न विचारतात, ज्यामुळे पॅन्ट्री मॅनेजरने हस्तक्षेप केला आणि प्रवाशाला रेकॉर्डिंग थांबवण्यास सांगितले. प्रवाशांनी पॅन्ट्री मॅनेजरवर टीका केली आणि खराब केटरिंग व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केली. व्हिडिओ अचानक संपतो.

व्हिडिओ शेअर करताना पत्रकाराने लिहिले की, “आमच्या गाड्यांमध्ये अन्न आणि पॅकबंद पाण्याचे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसते. स्थानिक वस्तू महागड्या दराने विकल्या जात आहेत तर रेल्वे नीर अजूनही अस्पर्शित आहे. एका तरुणाने हा व्हिडिओ बनवला आहे, कदाचित कुर्ला एक्सप्रेसवर. घटनेची तारीख स्पष्ट नाही, परंतु @AshwiniVaishnaw-ji कृपया यावर लक्ष द्या.”

जवळजवळ तीन लाख व्ह्यूज असलेल्या या व्हिडिओमुळे भारतीय रेल्वेमध्ये अशा घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. “भारतात वर्षानुवर्षे हे घडत आहे.. सर्वांनाच पैसे मिळतात आणि जनतेला फसवले जाते. या भ्रष्ट लोकांच्या डोळ्यात भीती पाहून मला आनंद झाला,” एका वापरकर्त्याने लिहिले.

त्यांना चांगलेच माहिती आहे की रेल्वे मंत्रालय त्यांना मोकळीक देणार नाही आणि त्यांना निश्चितच शिक्षा होईल,” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी दिली. “व्यवस्थापकाला निलंबित करा. रेल्वेमध्ये प्रवेश करणाऱ्या या भैय्यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाच्या अभावाने केटरिंग थर्ड क्लास बनवले आहे,” तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले.

२०१९ मध्ये, रेल्वे संरक्षण दलाने (RPF) १,३७१ जणांना अटक केली आणि ६९,२९४ हून अधिक बाटल्या जप्त केल्या, ज्याचा उद्देश अनधिकृत पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या विक्रीवर कारवाई करण्याचा देशव्यापी उपक्रम आहे. बेकायदेशीर बाटलीबंद पाण्याच्या विक्रीच्या समस्येला तोंड देण्यासाठी देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर ही कारवाई करण्यात आली, असे RPF ने सांगितले.

Story img Loader