दुबईत राहणा-या एका भारतीयाने नवा विश्वविक्रम केला आहे. कमी वेळात निर्वासितांकरता शाळेच्या वस्तू गोळा करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे, त्यामुळे ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.

दुबईत राहणा-या व्यंकटरमन कृष्णमूर्ती यांनी २४ तासांत निर्वासित मुलांसाठी दान गोळा करण्याचा विक्रम केला आहे. गेल्याच महिन्यात जगभरातील निर्वासित मुलांसाठी शाळेच्या वस्तू जमा करायच्या होत्या. यासाठी व्यंकटरमन यांनी देखील पुढाकार घेतला आणि अवघ्या चोवीस तासांत या मुलांसाठी मदत गोळा करण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या मदतीच्या विनंतीला प्रतिसाद देत अनेक शाळकरी मुलांनी, नोकरी करणा-यांनी व्यंकटरमन यांना भरभरून दान दिले आणि या निर्वासित मुलांसाठी त्यांनी जवळपास ११ किलो स्टेशनरी गोळा केली.

वाचा : सर्वांत कमी उंचीच्या दाम्पत्याची गिनिज बुकमध्ये नोंद!

त्यांच्याकडे आलेल्या दानात ५० हजार वह्या, २ हजार दप्तरे, तीन लाख पेन्सिल आणि इतर वस्तूंचा समावेश होता. या कामासाठी ४०० समाजसेवक कार्यरत होते. व्यंकटरमन देखील या समाजसेवकांपैकी एक आहेत. आपल्या मदतीमुळे जगभरातील निर्वासित मुलांना शाळेच्या उपयोगी वस्तू मिळणार असून त्यांच्या चेह-यावरील आनंद लाख मोलाचा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे निर्वासितांकरता शाळेच्या वस्तूंचे दान कमी वेळात गोळा करण्याचा विक्रम त्यांनी केला असून त्यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आले आहे. व्यंकटरमन हे मुळचे तामिळनाडूचे असून ९० च्या दशकात ते दुबईमध्ये स्थायिक झाले. चार्टर्ड अकाउंटट म्हणून ते काम पाहतात. एज्यूकेशन फॉर ऑल नावाची मोहिम त्यांनी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गरजू मुलांना शाळेसाठी लागणा-या वस्तू पाठवल्या जातात.

वाचा : सेल्फीच्या वेडामुळे ‘तो’ गिनीजबुकमध्ये झळकला

Story img Loader