Snake Found In Printing Machin Viral Video : सापासारखा सरपटणारा विषारी प्राणी कधी कोणत्या बिळात लपेल, याचा अंदाज बांधता येणार नाही. पण एका सापाने तर कमालच केली. ना कोणत्या बिळात, ना एखाद्या गवतात, साप चक्क घुसला तो प्रिंटरच्या कागदात. होय, हे सत्य आहे. ऑस्ट्र्रेलियातील सिडनीत असलेल्या एका कार्यालयातील प्रिंटिंग मशिनमध्ये विषारी साप विळखा घालून बसल्याचा थरारक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. एक महिला कर्मचारी प्रिंटरमधून कागद काढायला गेली होती. पण त्या प्रिंटरमध्ये एक विषारी साप लपला होता. तरुणीने त्या सापाला पाहिल्यानंतर जे घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. प्रिंटरमध्ये लपलेला एक इस्टर्न ब्राऊन साप पाहिल्यानंतर तरुणाची थरकाप उडाला. त्यानंतर तातडीन एका सर्पमित्राला संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर काय घडलं ते व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्हाला पाहता येईल.
प्रिंटरमध्ये साप सापडल्यानंतर कार्यालयात एकच खळबळ उडाली अन्…; पाहा धक्कादायक व्हिडीओ
एका कार्यालयातील प्रिंटरमध्ये साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की,” सापाने या प्रिंटरला थ्री डी व्हर्जनमध्ये बनवण्याचा निर्णय घेतला. विंडसर डीलरशिपकडून कार्यालयातील रिसेप्शनिस्ट प्रिंटरमध्ये कागद पुन्हा भरणार होती. पण तिने जेव्हा ड्रॉवर उघडला त्यावेळी प्रिंटरमध्ये इस्टर्न ब्राऊन साप असल्याचं पाहिलं. सापाला वेळीच बाहेर काढल्यानं कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही.” हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. साप सुरक्षितपणे पकडणाऱ्या सर्पमित्राचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “यापुढे प्रिंटर उघडताना या तरुणीला नक्कीच पॅनिक अटॅक येईल, यात काही शंका नाही.”
इथे पाहा व्हिडीओ
इस्टर्न ब्राऊन साप ऑस्ट्रेलियाच्या विषारी सापांपैकी एक आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नच्या ऑस्ट्रेलियन वेनम रिसर्च युनिटच्या आकडेवारीनुसार, अशा सापांच्या विषात खतरनाक न्यूरोटॉक्सिन असतं. याचा थेट परिणामा दंश झालेल्या रुग्णाच्या हृदयावर आणि डायाफ्रामच्या नसांवर होतो. ज्यामुळे माणासाच्या जीवाला धोका निर्माण होतो. इस्टर्न ब्राऊन सापाची प्रजाती ऑस्ट्रेलियाच्या काही भागात आढळते. विशेषत: हे साप शेतात आणि उपनगरीय क्षेत्रात आढळतात. ज्याठिकाणी त्यांना उंदरांची शिकार करणं सोपं होतं. तसेच हे साप मानवी वस्तीतही मुक्त संचार करत असतात.