सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात. प्राण्यांचे आणि त्यात मुख्यतः वाघाचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिले जातात. वाघ हा अतिशयक रुबाबदार आणि डॅशिंग प्राणी आहे. सद्य सोशल मीडियावर वाघाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतं आहे.आतापर्यंत खूप लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे.वाघ हा प्राणी रुबाबदार तर आहेच.शिकार करताना त्याचा ऍटिट्यूड आणि इतर वेळी वावरताना त्याचा तोरा सगळंच जाम भारी असतो.सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होतं असलेल्या व्हिडीओने सर्वांनाच थक्क करून सोडलं आहे.
उत्तर प्रदेश राज्यातून जाण्याच्या राष्ट्रीय राजमार्गावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिथं रस्त्याच्या कडेला एक वाघ पाणी पीत असल्याचं पाहायला मिळत आहे. जंगलात तुम्ही वाघाला पाणी पीत असल्याचं पाहिलं असेल. परंतु रस्त्याच्या कडेला एक वाघ पाणी पीत असल्याचं पाहिल्यानंतर दोन्ही बाजूच्या लोकांनी गाड्या लावल्या आहेत. जंगलाच्या राजाचा कुणी सुध्दा अपमान केलेला नाही. कोणीही त्याच्या बाजूनं जाण्याची हिम्मत करत नाहीये. वाघाचा दबदबा या व्हिडीओमधून पाहायला मिळाला.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Viral video: नागाची जोडी जेव्हा रोमॅन्टिक होते, नेटकरीही झाले अवाक्
हा व्हिडीओ खरा IFS अधिकारी आकाश दीप बधावन यांनी ट्विटरवर शेअर केला होता. त्यांनी लिहीलं आहे की, जंगलातील बफर क्षेत्र परिसरातील रेंज अधिकारी कतर्नियाघाट यांनी हा व्हिडीओ घेतला आहे. त्या परिसरात कायम प्राणी पाहायला मिळतात. हा व्हिडीओ आतापर्यंत ५४ हजार लोकांनी पाहिला आहे.