Kamala Harris Viral Video: लाइटहाऊस जर्नलिझमला यूएसएच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत हॅरिस यांचा प्रवेश होण्यापूर्वी हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. व्हिडीओमध्ये कमला हॅरिस असे म्हणताना दिसत आहेत की- Today is today. And yesterday was today yesterday. Tomorrow will be today tomorrow. So live today so that future today will past today, as it is tomorrow’. भाषांतर: आजचा दिवस आज आहे. काल हा काल होता. उद्या हा उद्या असणार आहे. त्यामुळे आज असे जगा की उद्याचा आज हा कालचा नाही तर आजचा आज असेल. या गोंधळात टाकणाऱ्या विधानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा चक्रावले होते. याविषयी आम्ही केलेल्या तपासात एक वेगळेच सत्य समोर आले आहे.

काय होत आहे व्हायरल? (Kamala Harris Viral Video)

X यूजर Smita Deshmukh ने विडिओ आपल्या प्रोफाइल वर पोस्ट केला.

Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
Milind Gawali
“१२ वीमध्ये मी मराठी विषयामध्ये नापास झालो”; मिलिंद गवळी म्हणाले, “मी वर्गात जाताना…”
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”
Manoj Bajpayee on his interfaith marriage with shabana raza
वडिलांच्या अंत्यसंस्काराला हिंदूंपेक्षा जास्त मुस्लीम…, मनोज बाजपेयींचे आंतरधर्मीय लग्नाबाबत वक्तव्य; म्हणाले, “आता सत्तेत असलेल्या सरकारचे…”

https://twitter.com/smitadeshmukh/status/1815218724271481260

इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडिओ पोस्ट करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओमधून मुख्य फ्रेम्स काढून तपास सुरू केला आणि नंतर मूळ व्हिडिओ शोधण्यासाठी त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. ‘Reproductive Freedom’ असे लिहिलेले फलक हातात घेऊन उभे काही लोक सुद्धा आम्हाला मागे दिसले. रिव्हर्स इमेज सर्च आणि गूगल कीवर्ड सर्चद्वारे आम्हाला न्यूयॉर्क पोस्टच्या युट्युब चॅनेलवर एक वर्षापूर्वी अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

व्हिडीओमध्ये मात्र हॅरिस व्हायरल झालेले विधान करताना दिसत नाहीत. आम्हाला याच कार्यक्रमाचा फेसबुक लाईव्ह व्हिडीओ देखील सापडला.

https://fb.watch/tv0ceW-JsF/

यामध्ये ५७ व्या मिनिटाला, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना भाषण देण्यासाठी मंचावर बोलाविण्यात आले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये केलेले वक्तव्य कमला हॅरिस यांनी लाइव्ह व्हिडिओमध्ये केले नाही. , “Today is today. And yesterday was today yesterday. Tomorrow will be today tomorrow. So live today so that future today will past today, as it is tomorrow.”

हे स्पीच ‘Reproductive Freedom for All’ या फेसबुक पेज वर शेअर करण्यात आले आहे.

https://www.facebook.com/watch/reprofreedomforall/

कमला हॅरिस यांनी केलेलं भाषणदेखील आम्हाला सापडलं.

https://www.whitehouse.gov/briefing-room/speeches-remarks/2023/04/25/remarks-by-vice-president-harris-at-a-political-event-on-reproductive-rights/

या अधिकृत साईटवरही आम्हाला व्हायरल झालेलं विधान सापडलं नाही.

आम्हाला २०२३ मधील रॉयटर्स आणि एपी मध्ये केलेली एक बातमी देखील आढळली ज्यामध्ये असे म्हटले आहे की व्हायरल व्हिडिओ डिजिटलरित्या एडिट केला गेला आहे. संपादित व्हिडिओ गेल्या वर्षभरापासून प्रसारित केला जात आहे.

हेही वाचा… हद्दच झाली! बिहारमधील ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून व्हाल थक्क

निष्कर्ष: कमला हॅरिस यांनी त्यांच्या भाषणादरम्यान गोंधळात टाकणारे विधान केले नाही. व्हायरल व्हिडिओ डिजिटली एडिट केलेला आहे, आणि गेल्या वर्षापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

Story img Loader