Vicky kaushal tauba tauba song Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला तेव्हापासून सतत विविध भाषांतील विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या विकी कौशलचा ‘बॅड न्यूज’ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमातलं ‘तौबा तौबा’ गाणं सध्या चांगलंच गाजतंय. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतंय. अनेकांनी यावर रील व्हिडीओ करीत चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. याच ‘तौबा तौबा’ गाण्यावर गावातील एका महिलेने केलेला रील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. विशेष म्हणजे या व्हिडीओवर विकी कौशलने जी कमेंट केली आहे, त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

महिलेच्या टॅलेंटचा व्हिडीओ तुफान व्हायरल

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
girl stunning dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला एका रात्रीमध्ये फेमस करते. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ बघितल्यानंतर खऱ्या टॅलेंटला संधीची वाट पाहावी लागत नाही हे सिद्ध होतंय. शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांना बऱ्याच संधी असतात; मात्र त्या तुलनेत गावाकडच्या महिलांना तेवढ्या संधी उलब्ध नसतात. कधी कधी यामुळे त्यांच्यातले छुपे गुण कधीच बाहेर येत नाहीत. मात्र, आता सोशल मीडियामुळे कुणालाही अगदी सहजपणे आपली कला लोकांपर्यंत पोहोचवता येते. अशीच कला या गावच्या महिलेने सादर केली.

विकी कौशलने केलेल्या कमेंटची चर्चा

रूपाली सिंग नावाच्या या महिलेने विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यावर डान्स केलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पिवळी साडी नेसून या महिलेनं तिच्या दोन मुलांसोबत जबरदस्त असा डान्स केलाय. विकीच्या डान्स स्टेप्स या महिलेनं हुबेहूब कॉपी केल्यात. इतकंच नव्हे, तिच्या दोन मुलांनीही तिला साथ दिलीय. शेवटी तिचा नवरा सायकल घेऊन येताना दिसतो. तोसुद्धा पत्नी आणि दोन मुलांचा डान्स पाहून आश्चर्यचकित झालेला दिसतो. महिलेच्या या डान्स व्हिडीओखाली विकीने ‘वॉव’ अशी कमेंट करून तिला दाद दिली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना घडवली जन्माची अद्दल, आजोबांचा VIDEO पाहून पोट धरुन हसाल

विकी कौशलच्या या फॅनचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओला ४६.७ दशलक्ष इतके व्ह्युज मिळाले आहेत. त्याशिवाय तब्बल २६ लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं असून, ४८ हजार लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. रूपाली सिंग ही गावात राहणारी महिला असून, तिचे सोशल मीडियावरील डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. ‘तौबा तौबा’ गाणं हे विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या ‘बॅड न्यूज’ सिनेमातलं गाणं असून हे गाणं आणि सिनेमा लोकांना आवडल्याचं दिसतंय.

Story img Loader