Vicky kaushal tauba tauba song Video: सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला तेव्हापासून सतत विविध भाषांतील विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे, तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या विकी कौशलचा ‘बॅड न्यूज’ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमातलं ‘तौबा तौबा’ गाणं सध्या चांगलंच गाजतंय. हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतंय. अनेकांनी यावर रील व्हिडीओ करीत चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. याच ‘तौबा तौबा’ गाण्यावर गावातील एका महिलेने केलेला रील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. विशेष म्हणजे या व्हिडीओवर विकी कौशलने जी कमेंट केली आहे, त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा