तुम्हाला अभिनेता विकी कौशल आवडतो का? तुम्ही जर त्याचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक मजेशीर व्हिडिओ घेऊन आलो आहोत. तुम्ही विकी कौशलला (Vicky Kaushal) ऑब्सेस्ड(Obsessed) गाण्यावर डान्स करताना पाहिले आहे का? नसेल तर आता इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा. या गाण्यावर विकी कौशलने जबरदस्त डान्स करून सर्वांची मन जिंकली आहेत. तुम्ही हा व्हिडिओ एकदा पाहिला तर तुम्ही पुन्हा पुन्हा पाहात राहाल.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप ट्रेंड होत आहे. लोकांना त्याचा व्हिडिओ खूप मजेशीर वाटत आहे. रियार साब, अभिजय शर्माचे हे अंडररेट केलेले पंजाबी गाणे २०२२ मध्ये रिलीज झाले होते, परंतु विकीच्या क्युट (Cute) डान्समुळे हे गाणे रातोरात सर्वांचे आवडते झाले आहे.

हेही वाचा – टॉयलेटमध्ये बसला होता व्यक्ती, शॉवरवर लटकणारा भलामोठा अजगर पाहून उडाला थरकाप अन्…

‘गडिया उचीया रखिया’ वर मीम्स व्हायरल

जेव्हाही सोशल मीडियावर एखादी गोष्ट ट्रेंड होते तेव्हा लोक त्याचे मजेशीर मीम्स तयार करतात. जेव्हा विकीचा ऑब्सेस्ड गाण्यावरचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा काही लोकांनी या गाण्याची पहिली ओळ ‘गडिया उचीया रखिया’वर काहीही सबंध नसलेले कार मीम्स तयार केले आहेत. काही लोकांनी चित्रपटांतील काही सिन्स शेअर केले आहे ज्यामध्ये कार हवेमध्ये उडताना दिसत आहे. यामध्ये रोहित शेट्टीचे देखील एक मीम्स आहे.

यामध्ये वेलकम चित्रपटातील एक दृश्य दिसत ज्याने सर्वांना खळखळून हसविले होते, ज्यामध्ये अक्षय कुमार कार चालविताना स्टिअरिंग व्हिल काढून हातात घेतो. परेश रावल अभिनीत हे दृश्य खूप प्रसिद्ध आहे. हा फोटो शेअर करून पोस्टला ‘गडिया उचीया रखिया’ हे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या लेकीचा विश्वविक्रम! सलग १२७ तास नृत्य करून गिनिज बूकमध्ये केली नोंद

धमाल देखील असाच चित्रपट आहे जो कोणीही आणि कधीही पाहू शकतो कारण हा अतिशय मजेशीर आहे. यामध्ये एक दृश्य आहे जेव्हा अरशद वारसी एका तुटलेल्या पुलावरून कार उडवून घेऊन जातो. हा फोटो शेअर करून ‘गडिया उचीया रखिया’ हे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा – एआयने तयार केला आनंद महिंद्रांचा फोटो, स्वत:ला पाहून म्हणाले, ‘आपलं भविष्य…’

असे अनेक मीम्स सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

Story img Loader