सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे प्राणी तसेच पक्ष्यांचे असतात. प्राण्यांचे विविध व्हिडीओ पाहायला लोकांना आवडते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कांगारूचे व्हिडीओ हे क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक कांगारूचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये कांगारूने कुत्र्यावर हल्ला केलाय, यावेळी कुत्र्याचा मालक आणि कांगारू यांच्यामधील झुंज व्हायरल होतेय.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका उंच कांगारूनं कुत्र्याला तलावाच्या आत ओढत नेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याने कुत्र्याला घट्ट पकडून ठेवले आहे. हा कुत्रा मिक मोलोनी नावाच्या माणसाचा होता, जो आपल्या कुत्र्याला मरे नदीच्या काठावर फिरायला घेऊन आला होता. मात्र, आपला कुत्रा अचानक गायब होईल याची त्याला कल्पना नव्हती. मोलोनीने बराच वेळ आपल्या कुत्र्याचा शोध घेतला, पण तो कुठेच सापडला नाही. मात्र, बऱ्याच शोधाशोधीनंतर त्यांचा कुत्रा कांगारूच्या तावडीत अडकलेला दिसला, त्यानंतर त्यांना धक्काच बसला. कारण कांगारूने कुत्र्याला आपल्या तावडीत तेही पाण्यात घट्ट पकडून ठेवले होते.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल

कुत्र्याला वाचवण्यासाठी देवदूत बनला मालक

आपल्या कुत्र्याला कांगारूच्या तावडीतून कसे सोडवायचे असा प्रश्न मालकाला पडला होता. यावेळी त्याने पाहिलं असता कांगारू त्याच्याकडे टक लावून पाहत होता. कांगारूनी कुत्र्याचा अर्धा चेहरा पाण्याखाली दाबला होता. पुढच्याच क्षणी मालक कशाचाही विचार न करता आपला जीव धोक्यात घालून कांगारूच्या दिशेने पाण्यात जाऊ लागतो. यावेळी तो त्याचा कॅमेराही चालू करतो, तो कांगारूच्या जवळ जातो आणि कुत्र्याला त्याच्या तावडीतून मुक्त करतो. ज्यानंतर कांगारू चिडतो आणि मालक मोलोनीवर हल्ला करू लागतो, ज्यामुळे त्याचा कॅमेरा पाण्यात पडतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावाच्या जीवाशी खेळ, कारच्‍या बोनेटवर ३ किमीपर्यंत नेले फरफटत

पुढे मोलोनी कॅमेरा पाण्यातून बाहेर काढतो आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरीकडे कुत्रा स्वत:चा जीव वाचवत पळून जातो. ही घटना ऑस्ट्रेलियातील असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोक मोलोनीने आपल्या कुत्र्याचा जीव वाचवल्याबद्दल त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

Story img Loader