Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा अंदाजही लागत नाही. पण याच अनपेक्षितपणाने आपलं पुरतं मनोरंजन होतं, हो ना? काही व्हिडीओ नकळत आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात तर काही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पारंपरिक विधी पण ट्रेंडिंग झाल्या आहेत. सुरुवातीला केळवण, ग्रहमख, हळद, बॅचलर पार्टी असे सगळे प्रकार होत होते पण ते मर्यादित गटांमध्ये विशेषतः साजरे केले जात होते. आता मात्र सर्व धर्म, सर्व जाती सगळ्या प्रकारच्या लोकांकडून आवडीनुसार प्रत्येक विधी केली जाते. अंनिसच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची विधी म्हणजे बारसं. आजवर आपण तान्हुल्या बाळाचं बारसं पाहिलं असेल पण १०६ वर्षाच्या आजीबाईंचं बारसं पाहणं सोडला विचार तरी केला होतात का?
म्हातारपण हे बालपणच असतं असं म्हणतात. पण म्हणून थेट आजींचा बारसा करावा? धानव्वा उडगे नामक एका १०६ वर्षीय आजीबाईंच्या बारशाचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, आजूबाजूच्या, नात्यातल्या महिला आवरून, नटून थटून आल्या आहेत. सगळ्या बायकांनी मिळून या आजींना उचलून घेतलं आणि जसं बारशाला कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या असं म्हणत बाळाला पाळण्यात घालतात तसं त्यांनी आजीबाईंना पाळण्यात ठेवलं आहे.
१०६ वर्षाच्या धानव्वा उडगे या आजीबाईंना106 व्या वर्षी दुधाचे दात परत आले होते.याचं सेलिब्रेशन म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे हा अनोखा कार्यक्रम पार पडला.
१०६ वर्षांच्या आजीचं बारसं
हे ही वाचा<< ब्लाइंड डेटला गेली व तरुणासह ‘ती’ १० दिवस बंद खोलीत अडकली; बाहेर येताच जे सांगितलं.. कुटुंब पूर्ण हादरलं
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी कुटुंबियांच्या उत्साहाचे कौतुक केले आहे. आयुष्याच्या १०६ व्या वर्षी जगताना प्रत्येक दिवस हा एक उत्सव असतो आणि त्यात तुम्ही या आजींना खुश केलं यासाठी तुमचं कौतुक अशा कमेंट्स या व्हिडीओखली दिसत आहेत.