Shocking Viral Video: देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह व जल्लोष पाहायला मिळत आहे. देवांचे देव गणपती हे बुद्धीदाता म्हणून प्रख्यात आहेत. गणपती आणि हत्तीचे फार जवळचे नाते आहे, त्यामुळेच हत्तीला सुद्धा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखले जाते. अशाच एका चतुर हत्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की, जंगलाचा राजा सिंहाला म्हंटले जाते आणि सिंह सुद्धा जर कोणाला घाबरत असेल तर ती म्हणजे सिंहीण. पण या व्हायरल व्हिडीओ मधील गजराज याला अपवाद ठरतात.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेला एक जंगलातील व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की तब्बल १४ सिंहीणी एका हत्तीवर हल्ला करत आहेत. अगदी हत्तीच्या पाठीवर बसून, पायाला पकडून, शेपटीला लटकून त्याला खाली पाडण्यासाठी या सिंहिणींचा प्रयत्न सुरु आहे. अर्थात विचारही करवणार नाही असा हा हल्ला झाल्यावर सुरुवातीला हत्ती सुद्धा गोंधळून जातो मात्र काहीच क्षणात आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून हत्तीच या सिंहिणींना अशी अद्दल घडवतो की बघूनच आश्चर्य वाटेल.
व्हिडीओ जसा पुढे सरकतो तसं तुम्ही पाहू शकता की सिंहिणींना पाठीवरून उतरवण्यासाठी हत्ती सुरुवातीला नदीत शिरतो आणि पुढील बाजूला तोंड करून हळूहळू चालू लागतो. हत्तीला नेमकं काय करायचंय हे लक्षात न आल्याने सिंहीणी सुद्धा त्याचा पाठलाग सुरु ठेवतात. मात्र इतक्यात हत्ती मागे वळतो आणि थेट सिंहिणीच्या दिशेने वेगाने धावून येतो. हा आक्रमक हत्ती पाहताच घाबरगुंडी उडालेल्या सिंहीणी सुद्धा माघारी वळून पळू लागतात.
पहा हत्ती व सिंहिणींची लढाई
थोडक्यात काय तर एक दोन नव्हे तब्बल १४ सिंहीणी मिळून सुद्धा एका हत्तीला हरवू शकल्या नाहीत. शक्ती आणि युक्ती दोन्हीच्या जोरावर अखेरीस हत्तीचं या सिंहिणींना धडा शिकवतो. हा व्हिडीओ आतापर्यंत तब्ब्ल २ लाख वेळा पाहिला गेला आहे.