ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरो या समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या बेबी व्हेल माशाची सुटका करण्यात आली. हा मासा जवळपास २४ तासांहून जास्त काळ किनाऱ्यावर अडकला होता. ४ टन वजनाचा आणि ३२ फूटाच्या या अवाढव्य माशाला समुद्रात सोडण्यात तेथील स्थानिकांना अखेर यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या माशाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ फेसबुकवर शेअर झाले असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत. हे व्हायरल झालेले फोटो पाहून ३०० जणांचे पथक माशाच्या मदतीसाठी या समुद्रकिनाऱ्यावर आले. मात्र हा मासा वाचेल असे कोणालाच वाटत नव्हते. अखेर अतिशय प्रयत्नाने या माशाची सुटका करण्यात मदत पथकाला यश आले आणि माशाने अखेर समुद्रात उडी मारली आणि सगळ्यांच्याच जीवात जीव आलाय त्या माशाच्या अंगावर साचलेली रेती काढण्यासाठी लोकांनी फावड्याचा वापर केला तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी त्याच्या अंगावर पाणीही ओतण्यात आले. एखाद्या मुक्या जीवाची अशी काळजी घेणारा हा व्हिडिओ सध्या अनेकांची मनं जिंकतोय.