400 Students Sang For Cancer Battling Teacher: सोशल मीडियावर क्रूरतेचे दर्शन घडवणारे अनेक अविश्वसनीय व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. पण काही वेळा अनपेक्षितपणेच असा एखादा सुंदर क्षण डोळ्यांसमोर येतो की ज्यामुळे सोशल मीडिया व एकूणच प्रेम, नाती, माणुसकी यावरील विश्वास आणखी दृढ होतो. असाच एक अत्यंत खास व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. टेनेसीच्या नॅशविल येथील क्राइस्ट प्रेस्बिटेरियन अकादमीच्या विद्यार्थ्यांची एक हृदयस्पर्शी क्लिप इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये एक हृदयस्पर्शी क्षण कॅप्चर केला गेला आहे. आपण पाहू शकता की यामध्ये तब्बल ४०० विद्यार्थी व काही शिक्षक त्यांच्या आवडत्या शिक्षकाच्या घराबाहेर जमा होऊन गाणे गात आहेत. बेन एलिस असे या शिक्षकाचे नाव असून त्यांच्या कॅन्सरच्या लढाईत प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे हे विद्यार्थी व शिक्षक सहकारी घराबाहेर जमा झाले होते असे समजतेय.

Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”

प्राप्त माहितीनुसार, बेन एलिस, हे क्राइस्ट प्रेस्बिटेरियन अकादमीचे शिक्षक होते. कॅन्सरशी आव्हानात्मक लढाईला सामोरे जात असताना त्यांना घरातच देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांचा एकटेपणा, दुःख व ताण कमी करण्यासाठी त्यांच्या अकादमीतील शिक्षक घराबाहेर जमा झाले होते.

X वर @historyinmemes या अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तब्बल ४०० विद्यार्थी मधुर आवाजात गाणे गाताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सुमधुर गाण्याने व त्याहूनही खास भावनेने आजुवाबाजूच्या वातावरणात सुद्धा ऊर्जा निर्माण होत असल्याचे दिसून येते. ही ऊर्जा अगदी आपल्या फोनवर बघताना सुद्धा जाणवते असं म्हटलं तरी अतिशयोक्ती वाटणार नाही.

हे ही वाचा << ७२१ फूट उंचीचे जगातील सर्वोच्च राम मंदिर भारतात नाही तर ‘या’ देशात होणार पूर्ण! वैशिष्ट्य व खर्च जाणून व्हाल थक्क

सदर रेकॉर्डिंग हे काही वर्षांपूर्वीचे आहे पण आता नव्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्या प्रिय शिक्षकांची व त्यांच्यामुळे आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांची आठवण सांगितली आहे. काहींनी या व्हिडीओ खाली कमेंट करून ‘खरोखरच माणुसकी अजूनही जिवंत आहे’ असे म्हटले आहे तर ‘या शिक्षकाने खरोखरच आयुष्यात पुण्य कमावले असणार त्यामुळे आज इतके लोक त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत’ अशा आशयाच्या सुद्धा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

Story img Loader