randma’s Incredible Marathon Story : आपल्यापैकी अनेक लोक असतील जे रोज ठरवतात की, उद्या सकाळी लवकर उठून धावायला जाईल पण करत मात्र कधीच नाही. व्यायाम करणे, चालणे धावणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांना माहित आहे पण त्याप्रमाणे वागणे मात्र सर्वांना जमत नाही. तुम्हाला गरज आहे थोड्या प्रोत्साहनाची. सध्या सोशल मीडियावर ७५ वर्षांच्या आजींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो नक्कीच तुम्हाला प्रोत्साहन देईल. ७५ वर्षांच्या आजी चक्क मॅरेथॉनमध्ये धावत आहेत जे पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
७५व्या वर्षी मॅरेथॉनमध्ये धावल्या आजीबाई
आजीबाईंचा हा व्हिडिओ व्यायामाचा, चालण्याचा किंवा धावण्याचा कंटाळा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लाजवले. कारण वयाच्या ७५व्या वर्षा या आजीबाई तंदुरुस्त आहेत पण मॅरेथॉनमध्ये धावून त्यांनी चक्का तिसरा क्रमांकही पटकावला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की दंडोबा क्रॉस कंट्री मॅरेथॉन स्पर्धेत आजीबाईंनी सहभाग घेतलेला आहे. आजीबाईंनी पारंपारित नऊवारी नेसली आहे आणि त्यावर स्पर्धेचा टीशर्ट देखील परिधान केला आहे. अनवाणी या आजीबाई इतर स्पर्धकांबरोबर धावताना दिसत आहेत.
आजीबाईंचा प्रोत्साहन देणारा व्हिडीओ
व्हिडिओ mayur_3274 नावाच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,७५ वर्षाच्या आजीबाईंनी मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.#trending #reels”
हेही वाचा –स्वारगेट बसस्थानक की बस तळे! पावसामुळे पाहा कशी झाली अवस्था, Video होतोय व्हायरल
नेटकऱ्यांनी आजीचे केले कौतूक
कमेंटमध्ये आणखी माहिती देताना लिहिले की, “आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की, या आजी धावतात. त्यांच्या मुलगाही सैन्यामध्ये भरती झाला आहे . खरंच मानलं पाहिजे या आजींना. एवढ्या खडकाळ डोंगरांमध्ये पायात कोणतेही शूज न वापरता त्यांनी ही स्पर्धा जिंकून दाखवली. नाहीतर आज आम्ही ब्रँड कंपनीची शूज घेऊन पण मेहनत घेत येत नाही.”
व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करून नेटकऱ्यांनी आजीबाईंच तोंडभरून कौतूक केले आहे. एकाने कमेंट करून लिहिले की, “फास्ट फूड समोर चटणी भाकरी कधीही सरसच ठरणार”
दुसऱ्याने लिहिले की, “आजी तुम्हाला सलाम”