Viral Video Today: प्राचीन भारतीय भाषा संस्कृत ही जगभरातील शेकडो भाषांची जननी म्हणून ओळखले जाते. जागतिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या जगाला या आईचा विसर पडत चालला आहे हे नव्याने सांगायला नको. मात्र अलीकडे दोन घटनांमधून कुठेतरी पुन्हा एकदा तरुणाई म्हणजेच विशेषतः येणारी पिढी संस्कृतकडे वळतेय असे काहीसे संकेत दिसत आहेत. अलीकडेच कॅम्ब्रिज विद्यापीठातील एका भारतीय तरुणाने २५०० वर्षांपूर्वीचं पाणिनीचं संस्कृत भाषेतील कोडिंगचं सूत्र सोडवलं होतं. तर सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये एक अवघ्या ८ महिन्यांची चिमुकली अस्स्खलित संस्कृत भाषेत आपल्या आईशी गप्पा मारताना दिसत आहे.
इंस्टाग्रामवर GiDDa CoMpAnY या अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज व लाईक्स आहेत. अनेकांनी यावर कमेंट करून हे निव्वळ अविश्वसनीय असल्याचे म्हंटले आहे. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुमची ही प्रतिक्रिया अशीच काहीशी असेल यात शंका नाही.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला एक आई तिच्या लेकीला संस्कृतमध्ये काही प्रश्न विचारते. आता आठ महिन्यांची मुलगी ती काय बरं उत्तर देणार आणि दिलं तरी संस्कृतमध्ये, अशक्यच वाटतं ना? पण जसं एका आईला आपल्या बाळाची भाषा जादुई पद्धतीने समजते. तशीच या तरुणीला सुद्धा आईची संस्कृत बोली समजते व त्यावर ती चक्क उत्तरही देते.
..अन् ८ महिन्याची चिमुकली संस्कृतमध्ये मारते गप्पा
हे ही वाचा<< मुलीच्या जन्माने हादरलं कुटुंब; पायगुण नव्हे तर ‘हे’ पाय बघूनच डॉक्टर झाले थक्क, पाहा Viral फोटो
दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या मायलेकी कोण आहेत हे अद्याप समजलेले नाही. एकीकडे आपल्या मुलांना मराठीही शिकवू इच्छित नसलेल्या पालकांच्या गर्दीत ही संस्कृत शिकवणारी आई मात्र नक्कीच कौतुकास्पद आहे.