Viral Video: विमानातून कितीही चैनीचा प्रवास करता येत असला तरी मज्जा ही खरी ट्रेनमध्येच! आजवर आपणही ऐकलं असेल, अनुभवलं असेल. आज त्याचं डोळ्यादेखत उदाहरण बघू शकता. ट्रेनचा प्रवास म्हंटला की डब्बे वाजवून अंताक्षरी खेळणं आलंच. गंमत म्हणजे तुम्ही आणि तुमच्या चार मित्रांनी जरी हा खेळ सुरु केला तरी त्यात पूर्ण ट्रेनची बोगी सहभाग घेते हे पण तितकं खरं आहे. अलीकडे वाराणसीतील काशी तमिळ संगममहून परतणाऱ्या ट्रेनमध्ये सुद्धा असाच काहीसा सुरेल संगम पाहायला मिळाला.
या ट्रेनमध्ये ८ वर्षीय मुलाने अत्यंत सुरेल आवाजात शास्त्रीय संगीताची मैफिल सजवली होती. सूर्यनारायण असे या मुलाचे नाव असून तो चेन्नईचा असल्याचे समजत आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, सूर्यनारायण हा वरच्या बर्थवर बसला आहे. प्राप्त माहितीनुसार तो आठ वर्षाचा असल्याचे समजतेय. इतक्या लहान वयात त्याची सुरांची पकड व कमाल आत्मविश्वास पाहून तुम्हीही भारावून जाल. अत्यंत सुरेल आवाजात तो शास्त्रीय संगीत गाताना दिसत आहे. सूर्यनारायणाच्या सुरात सूर मिसळून ट्रेनमधील अन्य प्रवासी सुद्धा गाताना दिसत आहेत. त्याचा निरागस चेहरा, सूर व हास्य पाहून तुमचेही मन आनंदून जाईल.
ट्रेनमध्ये सूर्यनारायण चमकला
हे ही वाचा<< Video: टीशर्ट खेचलं, नाही म्हणाली..बायकोसमोर दुसऱ्या तरुणीसह नाचले आजोबा, आजींनी ‘असा’ धडा शिकवला..
दरम्यान, हा व्हिडिओ @VarierSangitha नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला १.१८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि त्यावर कमेंट केल्या जात आहेत.