टी२० विश्वचषकाच्या गेल्या दोन दिवसातील सामन्यांमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. रविवारी नामिबियाने श्रीलंकेचा तर सोमवारी स्कॉटलँडने वेस्ट इंडिजचा ४२ धावांनी पराभव केला आहे. होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे स्कॉटलंड विरुद्ध वेस्ट इंडिज सामना झाला. मात्र सामान्यापेक्षाही यावेळी घडलेल्या एका अपघाताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होणार हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या काळजातही धस्स होईल. या व्हिडीओमध्ये आपण एक लाहान मूल पाहू शकतो. हे मूल लोखंडी हँडलला लटकलेले दिसत आहे. यानंतर मुलाचा तोल जातो आणि तो खाली पडतो. स्कॉटलँडच्या फलंदाजीच्या दरम्यान १४व्या षटकात ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, मुलाच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मुलाला वाचवण्यासाठी एक माणूस मागून धावत येतो. पण तोपर्यंत हे मूल खाली पडते. यानंतर तो माणूसही खाली उडी मारतो.

सुनील गावस्कर यांनी बाबर आझमला गिफ्ट केली आपली खास वस्तू; ‘त्या’ प्रायव्हेट डिनर पार्टीचे फोटो Viral

हा व्हिडीओ पाहून सर्वच घाबरले आहेत. तो मुलगा तिथे कसा पोहोचला याबाबत कोणालाही माहिती नाही. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत असून नेटकरी या मुलाच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. मॅचबद्दल बोलायचे झाले तर आयसीसी टी२० विश्व चषकातील हा तिसरा सामना होता. पात्रता फेरीत, स्कॉटलंडने होबार्टमधील आपल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ४२ धावांनी पराभव केला.

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने २० षटकांत ५ विकेट गमावून १६० धावा केल्या. जॉर्ज मुन्सीने ५३ चेंडूत ६६ धावा केल्या. दरम्यान, वेस्ट इंडिजचा संघ १८.३ षटकांत ११८ धावांमध्येच गारद झाला.

Story img Loader