Viral Video : आईवडिलांचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे. आईवडिल मुलांसाठी राबराब राबतात. आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करतात, त्यांची काळजी घेतात. मुलांना थोडा जरी त्रास असेल तर आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येतं. कायम मुलांच्या हिताचा विचार करणाऱ्या आईवडिलांविषयी महत्त्व सांगावे तितके कमी आहे. त्यांची जागा आपल्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही.

सहसा आपण आईविषयी प्रेम व्यक्त करतो. आईवर कविता किंवा निबंध लिहितो पण बाहेरून कठोरपणा दाखवणाऱ्या व आतून तितकेच हळवे असलेल्या वडिलांविषयी फार काही लिहीत नाही किंवा बोलत नाही. आई व्यक्त होते पण बाप व्यक्त होत नाही. बाप रागावतो, मारतो एवढंच काय तर लेकरांच्या हितासाठी वाईटपणाही घेतो. या वडिलांचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे.

या वडिलांविषयी सोशल मीडियावर एक चिमुकला बोलताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चिमुकला वडिलांविषयी काय म्हणतो, हे आज आपण जाणून घेऊ या.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक चिमुकला दिसेल जो वडिलांविषयी बोलताना दिसतो. तो म्हणतो, ” आपला बाप जरी अडाणी असला ना तरी असू द्या.. घरातील समीकरणं आणि आपल्या लेकराच्या आयुष्यातील गणितं हा फक्त आपला बाप सोडवू शकतो. ध्यानात ठेवा.” या व्हिडीओवर लिहिलेय, “शंभर टक्के खरं बोलला भाऊ!” या चिमुकल्याचा मेसेज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या वडिलांची आठवण येईल.
आयुष्यात कितीही अडचण आली तरी अडचणीच्या वेळी वडील सावलीप्रमाणे साथ देतात. अडचणीतून बाहेर काढतात आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

gavran_tadka1122 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. एक युजर लिहितो, “बरोबर आहे”

Story img Loader