Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर खूप भावुक करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भर मांडवात भाऊ बहिणीजवळ जाऊन रडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला स्टेजवर नवरी नवरदेव बसेलेल दिसेल. त्यांच्या शेजारी नातेवाईक मंडळी उभे आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरीचा भाऊ नवरीजवळ बसून ढसा ढसा रडत आहे. भावाला रडताना पाहून नवरी सुद्धा भावुक होते आणि तिलाही अश्रु अनावर होतात. यावेळी नवरदेव आणि इतर नातेवाईक नवरीच्या भावाला धीर देतात. त्यानंतर पुढे नवरीचा भाऊ नवरदेवाकडून एक वस्तू स्वीकारताना दिसतो. हा भावनिक व्हिडीओ पाहून कोणालाही रडू येईल. काही लोकांना त्यांच्या लग्नाचा दिवस आठवेन तर काही लोकांना त्यांच्या बहीण भावाची आठवण येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
हेही वाचा : Video : कधी शाळेत गेली नाही पण बोलते तब्बल ६ भाषा; ‘या’ पाकिस्तानी मुलीची एकच चर्चा, व्हिडीओ एकदा पाहाच
_akkii_45’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणत्याच नात्यात नसेल…एवढी ओढ एकाच नात्यात आहे.., म्हणून भाऊ-बहिणीचं हे नातं.., खूप गोड आहे”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भाऊ बहीण कितीही भांडत असले तरी या दिवशी रडणारच” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडिओ बघावं तेवढं कमीच आहे कारण बहीण भावाच नातं हे खूप अनमोल आहे…” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच भावा अंगावर काटा आला” एक युजर लिहितो, “आई नंतर बहीण ही भावाची दुसरी आईच असते …आणि ह्या क्षणाला भावाची स्थिती अशीच असते” तर एक युजर लिहितो, “एकदा बहीण तिच्या हक्काच्या घरातून गेली की ती परक्या घरची. ती माहेरी आली की ती एक पाहुणी म्हणून येते आई वडीलांच्या घरी राणी सारखी राहणारी मुलगी सासरी गेल्यावर मोलकरीण सारखी राहते” हा व्हिडीओ पाहून असे अनेक युजर्स भावुक झाले आहेत.