प्रत्येक प्राणी हा आपल्या प्रजातीच्या इतर प्राण्यांप्रमाणेच दिसतो. हा निसर्गाचा एक नियमच आहे. मात्र याच नियमाचा भंग झाला आहे. महाराष्ट्र-तेलंगणा परिसरात वसलेल्या धाबा गावामध्ये एका म्हशीने पांढऱ्याशुभ्र रेडकूला जन्म दिला आहे. शुक्रवारी रात्री या रेडकूचा जन्म झाला. यानंतर निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली आहे.

म्हैस रंगाने काळी असते. परिणामी तिच्या पोटी जन्माला येणारे रेडकूही काळ्याच रंगाचे असते. मात्र धाबा गावातील संजय येलमुले या शेतकऱ्याच्या म्हशीने शुक्रवारी रात्री पांढऱ्या रंगाच्या रेडकूला जन्म दिला आणि बघता बघता ही बातमी संपूर्ण गावात पसरली. यानंतर गावकऱ्यांनी या आगळ्यावेगळ्या रेडकूला पाहण्यासाठी तुफान गर्दी केली.

Ursekarwadi, Dombivli, Skywalk staircase,
डोंबिवलीत उर्सेकरवाडीमधील स्कायवॉक जिन्याच्या पायऱ्यांवर प्रवाशांची घसरगुंडी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
tabebuia rosea flowers Mumbai
निसर्गलिपी : बहराचा उत्सव
sonam wangchuck marathi news,
जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे नागपुरात “हेरिटेज ट्री वॉक”
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
Paaru
Video: संक्रातीच्या मुहुर्तावर सारंग-सावलीचे नाते फुलणार तर पारूवर येणार नवीन संकट, पाहा प्रोमो
Meet Indias first Gen Beta baby
हे आहे भारतातील ‘जनरेशन बीटा’चे पहिले बाळ! कोणत्या राज्यात झाला त्याचा जन्म? जाणून घ्या त्याचे नाव आणि ‘या’ पिढीची खास वैशिष्ट्ये

या रेडकूची शारीरिक स्थिती सुदृढ असली तरीही या म्हशीचे मालक चिंतेत आहेत. कारण आज सकाळपासून हे रेडकू दूध पित नाही आहे. खासगी पशुवैद्य या रेडकूची तपासणी करत असून त्यावर उपचार सुरु असल्याची माहिती संजय यांनी दिली आहे. दरम्यान, हे पांढरे रेडकू सध्या परिसरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.

इलॉन मस्कच्या पूर्व प्रेयसीनं लिलावात विकल्या प्रेमाच्या आठवणी; मिळवले तब्बल १.३ कोटी रुपये

संजय पंढरीनाथ येलमुले हे शेतकरी आहेत. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून ते म्हैस पालन करतात. त्यांच्याकडे तीन म्हशी असून त्या दररोज बारा लिटर दुध देतात. यातून येलमुले यांची महिन्याला बारा हजार रूपयांची कमाई होते.

Story img Loader