Viral Video : आई आणि मुलांचे नाते हे जगावेगळे असते. आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करते आणि मुलांच्या आनंदासाठी वाट्टेल ते करते. मुलं सुद्धा आईशिवाय क्षणभर राहू शकत नाही. आईचं प्रेम हे कोणाकडूनही मिळवता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातील आईची जागा ही कोणीही हिरावू शकत नाही. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला देवाघरी गेलेल्या आईच्या फोटोसमोर हातातला घास ठेवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणत्याही मुलाच्या आयुष्यात हा दिवस येऊ नये, असे आपल्याला वाटेल.

कोणत्याही मुलाच्या आयुष्यात हा दिवस येऊ नये!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक हार घातलेला महिलेचा फोटो दिसेल. या फोटोवर लिहिलेय, “कै. जयश्री अक्षय पाटोळे” आणि त्याखाली मृत्यू दिनांक लिहिलेली आहे, “२६ मार्च २०२५” व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या फोटोसमोर पानं ठेवलेली आहे आणि चिमुकला या पानांवर हातातला घास (भात) ठेवताना दिसत आहे. तो देवाघरी गेलेल्या आईच्या फोटोसमोर भाताचा घास ठेवताना दिसत आहे. तो इतका लहान आहे की त्याला हे सुद्धा समजत नसेल की त्याची आई जगात नाही. हा भावुक व्हिडीओ पाहून कोणालाही रडू येईल.
या व्हिडीओवर लिहिलेय, “आई परत येणं तू, तुझं लेकरू वाट पाहत आहे”

व्हायरल व्हिडीओ

ajit.lavate97 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आई विना भिकारी असलेल जीवन काय कामच. आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप वाईट झाले.. नि शब्द..” तर एका युजरने लिहिलेय, “देवा बाळाला सुखात ठेव” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाळा तू रडवलास रे” एक युजर लिहितो, “माझ्या आईची आठवण आली. कोणत्याच लेकराची आई जाऊ नये” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या आईची आठवण आली तर काही युजर्सनी रडण्याचे इमोजी शेअर केले आहेत.