Viral Video : गेल्या काही दिवसांमध्ये पाकीटचोरीचे अनेक प्रकरणे वाढले आहे. सार्वजानिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाकीटमारी केली जात असल्याचे दिसून येत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिला चोर मेट्रोमध्ये पाकीट मारताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की पाकीट मारताना तरुणीला रंगेहाथ पकडले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Video a woman caught red-handed in delhi metro while Pick-Pocketing what happened next Video goes viral)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली मेट्रोत पाकीट मारताना तरुणीला पकडले रंगेहाथ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही प्रवासी मेट्रोमध्ये चढताना दिसेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुणी मागून येते आणि महिला प्रवासीच्या खांद्यावर लटकवलेल्या बॅगवर हात ठेवते. तितक्यात एक मागुन पुरुष येतो आणि तिचा हात उचलतो. तेव्हा ती बॅगमधून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत असल्याची दिसते. लोक तिला रंगेहाथ पकडतात. काही लोक म्हणतात, “या चार जणी आहेत. चार महिला आहेत.” हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल . सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

दिल्लीत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सतर्क राहणे व मेट्रोमध्ये पाकीटमारी करणाऱ्या चोरट्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

Ghar Ke Kalesh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “महिला दिल्ली मेट्रोमध्ये पाकीट मारताना दिसली”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मेट्रोमध्ये भरपूर चोर असतात. ते चोरी करण्यात एवढे कुशल असतात की कोणीही त्यांना रंगेहाथ पकडू शकत नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “का नेहमी दिल्ली मेट्रोचे व्हिडीओ व्हायरल होतात? दिल्ली मेट्रो त्यावर कोणतीही कारवाई करत नाही का?” आणखी एका युजरने लिहिलेय, “दिल्ली मेट्रोमध्ये दररोज अशा घटना घडतात.” अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी सुद्धा पाकीटमारीच्या अशा अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.