Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओमध्ये एक आई फोनच्या नादात चक्क तिच्या बाळाला विसरते, नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोन हा माणासाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. माणूस क्षणभरही फोनशिवाय राहू शकत नाही. चालता बोलता, उठता बसता लोकांना हातात फोन पाहिजे असतो. तासन् तास फोनवर बोलणे, कधी रील्स स्क्रोल करत राहणे, कधी फोटो किंवा सेल्फी काढणे, रील शूट करणे, इत्यादी गोष्टींच्या माणूस इतका आहारी गेला आहे की प्रत्यक्ष आयुष्यात काय सुरू आहे, त्याच्या आजुबाजूला काय सुरू आहे, याचं भान नसतं.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आई दिसेल. ती फोनच्या नादात चक्क तिच्या बाळाला विसरते. फोनवर बोलता बोलता ती रस्त्याने चालताना दिसत आहे. पण फोनवर बोलण्याच्या नादात इतकी पुढे निघून जाते की तिचे बाळ ती मागेच विसरते. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती हातात बाळ घेऊन त्या महिलेला हाका मारताना दिसते. तरी सुद्धा तिला ऐकू जात नाही त्यानंतर इतर लोक जेव्हा तिला हाका मारतात तेव्हा तिचे लक्ष जाते आणि तिला धावत त्या व्यक्तीकडे येते आणि बाळाला कडेवर घेते. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

Kattappa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भयंकर कलियुग, फोनच्या नादात बाळाला विसरली”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हद्दच केली राव, फोन इतका महत्त्वाचा नाही” तर एका युजरने लिहिलेय, “हे काय पाहावं लागत आहे, चांगलं आहे की मी लग्न केलं नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे देवा, लोकांना कधी अक्कल येणार?” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.